अहमदनगर- अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर वरूणराजाची शुक्रवारी संगमनेर शहरात हजेरी लावली. सांयकाळी 7 वाजता जोरदार पाऊस पडल्याने शहरातील रस्ते जलमय झालेले पाहायला मिळाले.
संगमनेरमध्ये पावासाची दमदार हजेरी; शहरातील रस्ते जलमय - पाणी
पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने अहमदनगर जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. शेतकरी पावसाची वाट पाहत आहेत.
जोरदार पाऊस पडल्याने शहरातील सखल भागात पाणी साचले आहे. संगमनेरमध्ये पावसाने हजेरी लावली असली तरी अहमदनगर जिल्ह्यातील काही ठिकाणी पाऊस पडलेला नाही. यामुळे तेथील शेतकरी पावसाची प्रतीक्षा करत आहे.
जुलै महिन्याचा पंधरावडा संपून गेला तरी जिल्ह्यात अत्यल्प पाऊस झाल्याने केवळ 29 टक्के पेरण्या झाल्या आहेत. पाऊस पडल्याने पेरणी केलेल्या पिकांना दिलासा मिळाला आहे. पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे.