अहमदनगर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिवे प्रज्वलित करण्याच्या उपक्रमामुळे नैराश्याने ग्रासलेल्या देशवासीयांमध्ये नवा उत्साह निर्माण झाला आहे. कोरोनाच्या संकटाशी लढण्यासाठी प्रज्वलित दिव्यांनी प्रत्येक भारतीयाच्या मनात नवा आत्मविश्वास निर्माण केला, असल्याची प्रतिक्रिया माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.
'प्रज्वलित दिव्यांमुळे कोरोनाशी लढण्यासाठी देशाला आत्मविश्वास मिळाला' - lock down maharashtea
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहानाला प्रतिसाद म्हणून राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या कुटुंबियासमवेत लोणी येथील निवासस्थानी दिवे प्रज्वलित करून उपक्रमात सहभाग घेतला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहानाला प्रतिसाद म्हणून राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या कुटुंबियासमवेत लोणी येथील निवासस्थानी दिवे प्रज्वलित करून उपक्रमात सहभाग घेतला. यानंतर आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना विखे पाटील म्हणाले, कोरोनाच्या या संकटाने देशातील नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात भयग्रस्त आणि नैराश्याचे वातावरण निर्माण झाले आहे. विविध उपाय योजना करून पंतप्रधान मोदी देशवासीयांना दिलासा देण्याची महत्वपूर्ण भूमिका बजावत आहेत. या संकटाचा सामना करण्यासाठी देशातील नागरिकांमध्ये नवा आत्मविश्वास आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होण्यासाठी दिवे प्रज्वलित करण्याच्या आवाहनाला संपूर्ण देशातून उत्साही प्रतिसाद मिळाला. हे पाहताना या संकटाचा सामना करण्यासाठी पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देश एकजूटीने सज्ज असल्याचा संदेश जगाला मिळाला असल्याचे विखे पाटील म्हणाले. यापुर्वी जनता कर्फ्यू , टाळ्या आणि ठाळीनाद करून या लढाईत कर्तव्य बजावित असलेल्या व्यक्तींबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचे पंतप्रधानांचे आवाहन देशवासीयांनी यशस्वी केले होते. त्याच पार्श्वभूमीवर भारतीय संस्कृती आणि परंपरेत दिव्यांचे असलेले महत्व मोठे आहे. अंधकारातून प्रकाशाकडे जाण्याचा संदेश आम्हांला प्रज्वलित दिव्यातून मिळतो, असे विखे पाटील म्हणाले. हिच संकल्पना घेवून देशात नवा उत्साह निर्माण करतानाच कोरोनाच्या संकटाशी लढाई करण्यासाठी आवश्यक असलेली सकारात्मक ऊर्जा आणि उमेद प्रज्वलित दिव्यांमधून सर्वांनाच मिळाली असल्याकडे म्हणत विखे पाटील यांनी लक्ष वेधले.
येणाऱ्या काळातही या आपदेशी लढण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग हाच एकमेव उपाय असल्याने सर्व नागरिकांनी याचे गांभीर्य ठेवून लॉक डाऊनच्या उरलेल्या दिवसातही काळजी घेण्याचे आवाहन विखेंनी यानिमित्ताने पुन्हा केले.