अहमदनगर - माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त त्यांनी आज शिर्डीच्या साईमंदिरात जाऊन साईंचे दर्शन घेतले. राज्यातील दुष्काळ दूर व्हावा यासाठी त्यांनी प्रार्थना केली. उद्या होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबतही त्यांनी भाष्य केले.
दिलेली जबाबदारी सक्षमपणे सांभाळेन; मंत्रिमंडळ समावेशाबाबत विखेंचे सूचक वक्तव्य - मंत्रिमंडळ विस्तार
मुख्यमंत्री पक्षात भविष्यात जी जबाबदारी देतील, ती मी सक्षमपणे निभावण्याचा प्रयत्न करेन, असे म्हणत विखे-पाटलांनी त्यांच्या मंत्रिमंडळ समावेशाबाबत सूचक वक्तव्य केले आहे.
![दिलेली जबाबदारी सक्षमपणे सांभाळेन; मंत्रिमंडळ समावेशाबाबत विखेंचे सूचक वक्तव्य](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-3567720-thumbnail-3x2-viks.jpg)
उद्या (रविवार) सकाळी ११ वाजता मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असून राधाकृष्ण विखे-पाटील यांना मंत्रिपद मिळणार असल्याची चर्चा सुरु आहे. मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी त्यांनी साईंचे दर्शन घेऊन प्रार्थना केली. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत विखेंना विचारले असता, तो सर्वस्वी अधिकार मुख्यमंत्र्यांचा असून राज्य सरकारकडून अधिकृत पत्र निघत नाही तोपर्यंत यावर बोलणे उचित ठरणार नाही, असे सांगितले. मुख्यमंत्री पक्षात भविष्यात जी जबाबदारी देतील, ती मी सक्षमपणे निभावण्याचा प्रयत्न करेन, असे म्हणत त्यांच्या मंत्रिमंडळ समावेशाबाबत सूचक वक्तव्य केले आहे.