अहमदनगर - विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाचा राजनामा दिल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील हे प्रथमच युतीच्या मंचावर आले होते. विखे यांच्या भाजप प्रवेशावर तर्क वितर्क लावले जात आहेत. आज दुपारी १२ वाजता लोणी येथे पत्रकार परिषद घेऊन ते आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे बोलले जात आहे.
राधाकृष्ण विखे-पाटील भाजप प्रवेशाबाबत दुपारी १२ वाजता करणार भूमिका स्पष्ट - congress
राधाकृष्ण विखे पाटील यांनी सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारासाठी सभा घेतली आहे. यावेळी त्यांनी शरद पवार आणि थोरातांवर जोरदार निशाणा साधला आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुकही केले आहे.
पुत्र सुजय विखेंच्या भाजप प्रवेशानंतर राधाकृष्ण विखे हे काँग्रेसपासून अलिप्त होते. शिवसेनेचे शिर्डीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारार्थ विखेंनी साकुरी येथे सभा घेतली. यावेळी त्यांनी पवार आणि थोरातांवर जोरदार टीका केली आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांनी सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारासाठी सभा घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुकही केले. आम्ही सांगितल्यामुळे मोदींनी स्वतंत्र पाणी मंत्रालयाची घोषणा केली. तसेच पवार आणि थोरातांकडून फक्त भावनिक आणि व्यक्तिगत राजकारण केले जात असल्याची टीका विखेंनी तेथे केली.