महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मराठा आरक्षणासाठी सर्व संघटनांनी एकत्र येऊन सरकारवर दबाव आणावा - राधाकृष्‍ण विखे-पाटील - राधाकृष्ण विखे पाटील

छत्रपती संभाजी महाराजांनी नवीन पक्ष काढण्‍याच्‍या संदर्भात सुतोवाच केले असले तरी, आरक्षणाच्‍या मुद्यावर मराठा समाजाने कोणत्‍याही पक्षाच्‍या बाजूने आपली भूमिका उभी केलेली नाही. आरक्षणाचा अंतिम निर्णय आणि आरक्षण पदरात पाडून घेण्‍यासाठी सर्व संघटनांना ए‍कत्रित येवून, सरकारवर दबाव आणावा लागेल असे स्‍पष्‍ट मत माजीमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी व्‍यक्‍त केले.

vikhe patil on reservation
vikhe patil on reservation

By

Published : May 29, 2021, 5:24 PM IST

शिर्डी (अहमदनगर) - छत्रपती संभाजी महाराजांनी नवीन पक्ष काढण्‍याच्‍या संदर्भात सुतोवाच केले असले तरी, आरक्षणाच्‍या मुद्यावर मराठा समाजाने कोणत्‍याही पक्षाच्‍या बाजूने आपली भूमिका उभी केलेली नाही. आरक्षणाचा अंतिम निर्णय आणि आरक्षण पदरात पाडून घेण्‍यासाठी सर्व संघटनांना ए‍कत्रित येवून, सरकारवर दबाव आणावा लागेल असे स्‍पष्‍ट मत माजीमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी व्‍यक्‍त केले.


मराठा आरक्षणाच्‍या प्रश्‍नासंदर्भात माध्‍यमांशी संवाद साधतांना विखे-पाटील म्‍हणाले की, आरक्षणाच्‍या संदर्भात छत्रपती संभाजी महाराजांनी मांडलेली भूमिका ही मराठा समाजाच्‍या हिताचीच आहे. पण सरकारला केवळ अल्‍टीमेटम न देता सर्व मराठा संघटनांना सोबत घेवून भूमिका मांडण्‍याची गरज असल्‍याचे त्‍यांनी ठणकावून सांगितले. मराठा आरक्षण देण्‍यात महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरले आहे. केवळ अपयश झाकण्‍यासाठी केंद्राकडे बोट दाखविण्‍यात आघाडी सरकार स्‍वत:चा वेळ वाया घालवत आहे. सरकारमधील मंत्र्यांची वेगवेगळी वक्‍तव्‍य पाहिल्‍यास आरक्षणाच्‍या संदर्भात आघाडी सरकारचा हेतू प्रामाणिक नसल्‍याची टीका त्‍यांनी केली.

छत्रपती संभाजी महाराजांनी नवीन पक्ष काढण्‍यासंदर्भात केलेल्‍या वक्‍तव्‍यावर विखे पाटील म्हणाले, पक्ष काढण्‍याबाबतचा निर्णय हा सर्वस्‍वी त्‍यांचा व्‍यक्‍तिगत आहे. मात्र मराठा समाजाने कोणत्‍याही पक्षाच्‍या बाजूने आपली भूमिका उभी केलेली नाही, याकडे लक्ष वेधून विखे पाटील म्‍हणाले की, आरक्षणाच्‍या प्रश्‍नासाठी सर्वांना एकत्रित भूमिका घेवूनच पुढे जावे लागेल. मराठा आरक्षण पदरात पाडून घेण्‍यासाठी समाजातील सर्व संघटनांना एकत्रितपणे दबाव आणण्‍याशिवाय पर्याय नसल्‍याचे त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

ABOUT THE AUTHOR

...view details