अहमदनगर - राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत जोरदार जल्लोष केला. विखे पाटील यांच्या लोणी गावात कार्यकर्त्यांनी ऐकमेकांना पेढे भरवून डिजेच्या तालावर ठेका धरला.
विखे पाटलांच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष, ऐकमेकांना पेढे भरवत डिजेच्या तालावर धरला ठेका
राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत जोरदार जल्लोष केला. विखे पाटील यांच्या लोणी गावात कार्यकर्त्यांनी ऐकमेकांना पेढे भरवून डिजेच्या तालावर ठेका धरला.
आज अखेर प्रलंबीत असलेला मंत्रीमंडळ विस्तार झाला. यामध्ये राधाकृष्ण विखे पाटलांनी कॅबीनेट मंत्रीपदाची संधी देण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राधाकृष्ण विखे पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार ही चर्चा सुरू होती. आज राज्याच्या कॅबिनेट पदाची शपथ घेतल्यानंतर या चर्चेला पुर्ण विराम मिळाला आहे. त्यामुळे आता अहमदनगर जिल्ह्यातील सत्तेची सगळी समिकरणे बदलणार आहेत. एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या अहमदनगर जिल्ह्यात काँग्रेस आता शिल्लक राहील की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. राधाकृष्ण विखे पाटलांच्या रूपाने भाजपच्या गळाला मोठा मासा लागला आहे. त्यांच्या अनुभवी राजकारणाचा भाजपला नक्कीच फायदा होणार आहे. विखे पाटील मंत्री झाल्याने त्यांच्या समर्थकांनी आज लोणी, राहाता, शिर्डी यासह अनेक ठिकाणी मोठा जल्लोष केला.