महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Hsc Question Paper Burning Case : प्रश्नपत्रिका जळाल्या की जाळल्या?; विखे पाटलांकडून उच्चस्तरीय चौकशीची मागणी - HSC Exam Paper Postponed

ध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या मराठी विषयाच्या प्रश्नपत्रिका ( 12th Exam Question Papers ) होत्या. त्या जळून खाक झाल्या आहेत. प्रश्‍नपत्रिका जळाल्‍या की, जाळल्‍या याबाबत कोणताही खुलासा परिक्षा महामंडळ करु शकलेले नाही. त्‍यामुळे या घटनेची उच्‍चस्‍तरीय चौकशी करण्‍याची मागणी विखे पाटील यांनी ( Radhakrishna Vikhe Patil on Hsc Question Paper Burning Case ) केली.

Radhakrishna Vikhe Patil
राधाकृष्ण विखे पाटील

By

Published : Feb 25, 2022, 3:30 PM IST

अहमदनगर - पुणे-नाशिक महामार्गावर संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी घाटात एका धावत्या ट्रकला आग लागली. त्यामध्ये माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या मराठी विषयाच्या प्रश्नपत्रिका ( 12th Exam Question Papers ) होत्या. त्या जळून खाक झाल्या आहेत. यावर माजी मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी ( Radhakrishna Vikhe Patil on Hsc Question Paper Burning Case ) संशय व्यक्त केला आहे. दहावी आणि बारावीच्‍या प्रश्‍नपत्रिका घेवून जाणाऱ्या टेम्‍पोला लागलेल्‍या आगीची घटना अतिशय गंभीर असून प्रश्‍नपत्रिका जळाल्या की जाळल्या, असा सवाल त्यांनी केला. तसेच या प्रकरणी त्यांनी उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली.

महाविकास आघाडी सरकारच्‍या काळात भरती प्रक्रियेसाठी कोणतीही परिक्षा पारदर्शकपणे होवू शकलेली नाही. सर्वच परिक्षांच्‍या प्रश्‍नपत्रिका फुटण्‍याचे प्रकार वारंवार घडल्‍याने या सरकारच्‍या काळात सर्वच परिक्षा संशयाच्‍या भवऱ्यात अडकल्‍या असल्‍याची टीका त्यांनी केली. दहावी -बारावीच्‍या परिक्षा तोंडावर आल्‍या असताना प्रश्‍नपत्रिका घेवून जाणाऱ्या टेम्‍पोला लागलेल्‍या आगीची घटना अतिशय गंभीर असल्याचे त्यांनी म्हटलं.


काल परिक्षा महामंडळाने तांत्रिक कारण सांगून पेपरच्‍या तारखा पुन्‍हा नव्‍याने जाहीरही करुन टाकल्‍या. परंतू यातील नेमके तांत्रिक कारण कोणते? असा प्रश्‍न अनुत्तरीतच राहतो. प्रश्‍नपत्रिका जळाल्‍या की, जाळल्‍या याबाबत कोणताही खुलासा परिक्षा महामंडळ करु शकलेले नाही. त्‍यामुळे या घटनेची उच्‍चस्‍तरीय चौकशी करण्‍याची मागणी विखे पाटील यांनी केली.

एकीकडे कोरोना संकटाने सर्वाधिक नुकसान शिक्षण क्षेत्राचे झाले आहे. सरकार स्‍वत:चेच निर्णय मागे घेत राहिले. शाळा सुरु करण्‍यापासून ते दहावी, बारावीच्‍या परिक्षांच्‍या बाबतीतही सरकार ठाम राहीले नाही. आघाडी सरकारचा कारभार हा पुर्णत: गोंधळलेला असल्‍याची टिका करुन, सरकारच्‍या निर्णयातील धरसोड वृत्‍तीच विद्यार्थी आणि पालकांची चिंता वाढवत असल्‍याचे विखे पाटील म्‍हणाले.


केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्‍याच्‍या महाविकास आघाडीच्‍या नेत्‍यांकडून होत असलेल्‍या आरोप नाकारून आपले अपयश झाकण्‍यासाठी, असे आरोप केले जात आहेत. भ्रष्‍टाचाराची प्रकरण उघड होतील अशी भिती असल्‍यानेच जनतेचे लक्ष विचलीत करण्‍याचे काम महाविकास आघाडीच्‍या नेत्‍यांकडून होत असल्‍याचे त्‍यांनी म्हटलं.


आघाडी सरकारमधील कॉंग्रेसच्‍या सहा मंत्र्यांच्‍या खात्‍यांमध्‍ये होत असलेल्‍या संभाव्‍य बदल्यांच्‍या चर्चेवर भाष्‍य करताना विखे पाटील यांनी कॉंग्रेसला आपली प्रतिमा सुधरायची असेल तर, आघाडी सरकारमधून बाहेर पडले पाहीजे. परंतू भ्रष्‍टाचाराच्‍या विळख्‍यात ते अडकले आहेत. मंत्री राहीलो तर संरक्षण मिळेल आणि सत्तेतून बाहेर पडलो तर बेड्या पडतील, अशी भिती त्‍यांना सतावत असल्‍यानेच ते होणे शक्‍य नाही. त्‍यामुळे कॉंग्रेसच्‍या भवितव्‍याची कोणालाही चिंता नसल्‍याचा टोला त्‍यांनी लगावला.

हेही वाचा -Russia Ukraine Crisis : अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचा इशारा.. रशियाने नाटो देशांत प्रवेश केला तर अमेरिका करेल 'असं' काही

ABOUT THE AUTHOR

...view details