नगर (शिर्डी): जगभरासह राज्यात देखील पुन्हा एकदा कोरोनाने आपले पाय पसरले आहे. त्यामुळे दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशातच आता माजी मंत्री आणि भाजपचे जेष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांना कोरोनाची लागण ( Senior BJP leader Radhakrishna Vikhe Patil infected corona ) झाली आहे. याबाबतची माहिती स्वत: राधाकृष्ण विखे पाटील ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.
Radhakrishna Vikhe Patil Corona Positive : राधाकृष्ण विखे पाटील यांना कोरोनाची लागण; ट्विटवरुन दिली माहिती - भाजपचे जेष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील
भाजपचे जेष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील ( Senior BJP leader Radhakrishna Vikhe Patil ) यांना कोरोनाची लागण. सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली माहिती. या अगोदर ही विधानसभेच्या अधिवेशनात सहभागी असणाऱ्या काही लोकांना कोरोनाची लागण झाली होती.
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभेच्या अधिवेशनाला ( Maharashtra winter session 2021 ) भाजपचे जेष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी अहमदनगर येथील विखे पाटील रूग्णालयात कोविड टेस्ट केली होती. ज्यामध्ये त्यांची कोविड टेस्ट पॉझिटीव्ह आली आहे. याबद्दल राधाकृष्ण विखे पाटील यांनी ट्विट द्वार माहिती दिली आहे.
राधाकृष्ण विखे पाटील यांचं ट्विट-
'आज माझी कोव्हीड टेस्ट पॉझीटीव्ह आली असल्याने मी स्वतः विलीगीकरणात जात आहे. माझे पुढील काही दिवसांचे कार्यक्रम रद्द करावे लागत असल्यामुळे आयोजकांच्या गैरसोयी बद्दल क्षमस्व. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी स्वतःची कोव्हीड टेस्ट करावी व काळजी घ्यावी.' असे माजी मंत्री आणि भाजपचे भाजपचे जेष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी ट्विट केले आहे. त्याचबरोबर त्यांनी इतरांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
या अगोदर आदिवासी विकासमंत्री के. सी. पाडवी आणि शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. त्याचबरोबर हिवाळी अधिवेशनात सहभागी असणाऱ्या 35 पोलीस कर्मचारी आणि सरकारी कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.