महाराष्ट्र

maharashtra

शिवजयंतीसाठी नियमावली बनवणं राज्याच्या अस्मितेला धक्का - विखे पाटील

By

Published : Feb 13, 2021, 3:10 PM IST

Updated : Feb 13, 2021, 3:16 PM IST

शिवजयंतीला नियमावली तयार करुन महाविकास आघाडी सरकारने महाराष्‍ट्राच्‍या अस्मि‍तेला धक्‍का पोहचवला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या मिरवणुकांना मात्र नियमावलीत अडकवले जातंय, अशी टीका भाजप नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सरकारवर केली आहे.

Radhakrishna Vikhe Patil criticizes the state government
Radhakrishna Vikhe Patil criticizes the state government

शिर्डी (अहमदनगर) -शिवजयंतीला नियमावली तयार करुन महाविकास आघाडी सरकारने महाराष्‍ट्राच्‍या अस्मि‍तेला धक्‍का पोहचविला आहे. मंत्र्यांच्‍याच मि‍रवणुका राज्‍यात बिनधास्‍तपणे सुरू आहेत. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या मिरवणुकांना मात्र नियमावलीत अडकविले जातंय. महाविकास आघाडी सरकारने हा विषय प्रतिष्‍ठेचा न करता ही नियमावली तातडीने मागे घेण्याची मागणी भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

अन्यथा भविष्यात मोठी किंमत चुकवावी लागणार -

भाजप नेते राधाकृष्ण विखे-पाटील आज आपल्या गावी लोणी येथे असताना प्रसार माध्यमांशी बोलताना यावेळी म्हणाले की, राज्‍यात वीज वितरण कंपनीने वीज तोडण्‍याचे सुरु केलेले काम म्‍हणजे अडचणीत सापडलेल्‍या शेतकऱ्यांच्‍या जखमेवर मीठ चोळण्‍यासारखे आहे. राज्‍यातील शेतकरी आधीच आर्थिक संकटात सापडलेला असताना सरकारकडून वीज बिलांमध्‍ये सूट मिळेल अशी अपेक्षा होती, परंतु दिलासा सोडाच धाक दपटशाहीने सुरू केलेले वसुलीचे काम दुर्दैवी असून सरकारने केलेली घोषणा विसरलंय. सरकारने वीज तोडणी त्वरीत थांबवावी. अन्यथा भविष्यात मोठी किंमत चुकवावी लागणार असल्याचा इशारा राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सरकारला दिला.

भाजप नेते राधाकृष्ण-विखे पाटील
सत्तेत राहण्यासाठी मुख्यमंत्री किती तडजोडी करणार राज्याच्या अस्मितेची लक्तरे वेशीला टांगली जाताहेत. पूजा चव्हाणच्या आत्महत्येत शिवसेनेच्या मंत्र्याचं नाव आहे. या युवतीच्‍या झालेल्‍या मृत्‍यूची सखोल चौकशी झाली पाहिजे. या संदर्भात भारतीय जनता पक्षाने काही ऑडिओ क्‍लीप पोलीस महासंचालकांना दिल्‍या आहेत. मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करणे गरजेचे असून या घटनेतील सत्‍य जनतेसमोर आणावे. आघाडी सरकारने कोणालाही पाठीशी घालू नये, असेही यावेळी राधाकृष्ण विखे-पाटील यांनी मागणी केली.
विखे-पाटलांची काँग्रेसवर घणाघाती टीका -
कॉंग्रेसला आघाडी सरकार आपल्‍यामुळे आहे, असे वाटत असेल तर, कॉंग्रेसच्‍या मंत्र्यांचे अस्तित्‍वच कुठे जाणवत नाही. किमान समान कार्यक्रमातही कॉंग्रेसला डावललेच गेले आहे. या सरकारचा रिमोट ना शिवसेनेकडे राहिला ना सरकारमध्‍ये कॉंग्रेसला बळ आहे. आता काँग्रेसने इशारा द्यायचं सोडून द्यावं. लाचारी पत्करून सत्तेत राहण्यापेक्षा काँग्रेसने सत्तेबाहेर पडावं. अशी घणाघाती टीका राधाकृष्ण विखे-पाटील यांनी काँग्रेसवर केली आहे.
Last Updated : Feb 13, 2021, 3:16 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details