अहमदनगर : जिल्ह्यात साईपालखीच्या पदयात्रेतच ऑनरकिलिंग करण्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बहिणीने पळून जावुन लग्न करण्याचा ( marrying against the family ) राग मनात असताना पुसदच्या तरूणाने पदयात्रा शिर्डीत दाखल होण्यापूर्वीच थेट बहिणाच्या नवऱ्यावर गोळीबार ( Pusad young man attempts on Honor killing ) केला आहे.
काय आहे प्रकरण : मुंबईतील गोरेगावची द्वारकाधीश ही साईंची पायी पालखी दहा पंधरा दिवसांपुर्वी शिर्डीला निघाली. मुंबईतुन निलेश पवार व त्याची पत्नी या पालखीतुन पायी शिर्डीला साईदर्शनासाठी निघाले. याबाबतची माहिती पुसद येेथे राहणाााऱ्या विकी भांगेला समजताच त्याने मेहुण्याचा पदयात्रेतच काटा काढण्याचा निर्णय घेतला. तो मुंबईपासुन या पालखीच्या पाळतीवर होता. शिर्डी अगदी पाच किमी अंतरावर आली तरी त्याला योग्य संधी मिळत नव्हती. अखेर, आज शुक्रवारी दुपारी ही पालखी शिर्डीजवळील सावळेविहीर येथे नाष्टा करण्यासाठी थांबलेली असतांना विकीने गावठी कट्टयातुन मेहुणा निलेश पवार याच्यावर दोन गोळ्या झाडल्या. या गोळ्या निलेशच्या खांद्याला लागल्या. यानंतर पळुन जाण्याचा प्रयत्न करत असतांना विकीला पालखीतील अन्य पदयात्रींनी पकडून चांगला चोप देत पोलीसांच्या ताब्यात दिले. ‘जाको राखे साईया मार सके ना कोई’ याचा प्रत्यय पदयात्रींना या निमीत्ताने आला.