अहमदनगर - आज देशभर पल्स-पोलिओ मोहीम राबविण्यात येत असून त्या अनुषंगाने अहमदनगर शहरासह जिल्ह्यात या मोहिमेची तयारी जिल्हा परिषद, महानगरपालिका, पालिका यांच्या आरोग्य विभागाने केलेली आहे.
अहमदनगर : जिल्ह्यात पल्स पोलिओ मोहीम, शहरात ४६ हजार बालकांना डोस - अहमदनगर मनपा आरोग्य विभाग न्यूज
शहरात अहमदनगर महानगरपालिकेने या निमित्ताने ३७४ बुथवर पल्स-पोलिओचा डोस ४६ हजार दोनशे सत्तर पाच वर्षाखालील बालकांना दिला जाणार आहे. आज सकाळी महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या उपस्थित या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी, अनेक पालक आपल्या पाच वर्षाखालील बालकांना डोस देण्यासाठी उपस्थित होते.
हेही वाचा -मन की बात : '२६ जानेवारीला दिल्लीत तिरंग्याचा अपमान झाल्यामुळे संपूर्ण देश दु:खी'
जिल्ह्यात गेल्या दहा वर्षात एकही पोलिओ रुग्ण आढळला नसला तरी केंद्र-राज्य सरकारच्या निर्देशाप्रमाणे पल्स-पोलिओ कार्यक्रम राबवला जात आहे. जागरूक नागरिकांचा त्याला चांगला प्रतिसाद असून ऊसतोडणी, वीटभट्टी आदी कामगार वर्गांसाठी त्या स्थळावर जाऊन पोलिओ डोसची व्यवस्था करण्यात आली असल्याचे मनपा आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांनी यावेळी सांगितले. शहरातील बस स्टॅण्ड, रेल्वे स्टेशन याठिकाणी पोलिओ डोस देण्यासाठी विशेष बूथ उघडण्यात आले आहेत.
हेही वाचा -स्वच्छतेसाठी झटणाऱ्या केरळच्या दिव्यांग व्यक्तीचे पंतप्रधानांनी केले कौतुक