अहमदनगर -चोरीचा माल घेतल्याच्या गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी, नाशिकमधील सराफाकडून एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना संगमनेरमधील पोलीस उपनिरीक्षक राणा परदेशी यांना पकडण्यात आले. नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने संगमनेर पोलीस ठाण्याच्या परिसरात सापळा रचत ही कारवाई केली.
काय आहे प्रकरण -
संगमनेर शहरातील मालदाड रोड परिसरातील विद्युत कॉलनीमध्ये घरफोडी झाली होती. यात सुमारे सव्वातीन लाखाचा मुद्देमाल चोरीला गेला होता. या चोरीत आरोपीने आपले आई-वडील नाशिक येथे दवाखान्यात असल्याने स्वतःच्याच घरात चोरी केली होती. या चोरीत लांबविलेले दागिने आरोपीने नाशिक येथील मित्राच्या मदतीने सोनाराला विकले होते. त्यानंतर आरोपी फरार होते. पोलिसांनी तपास केला. यामध्ये दोघा आरोपींना पोलिसांनी अटक केली.
सोनाराकडे पैशाचा तगादा