अहमदनगर- जिल्हा क्रीडा अधिकाऱ्याविरोधात जिल्ह्यातील विविध क्रीडा संस्था आणि संघटनांनी एकत्र येत रास्तारोको आंदोलन केले. जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे या मनमानी कारभार करत जाणीवपूर्वक क्रीडा संघटनांना वेठीस धरत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे. हे आंदोलन नगर-पुणे रस्त्यावर करण्यात आले.
जिल्हा क्रीडा अधिकाऱ्याविरोधात अहमदनगरमध्ये रास्ता रोको - anil rathod
जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे या मनमानी कारभार करत जाणीवपूर्वक क्रीडा संघटनांना वेठीस धरत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे. हे आंदोलन नगर-पुणे रस्त्यावर करण्यात आले.
आंदोलनात जिल्ह्यातील अनेक खेळाडू सहभागी झाले होते. या खेळाडूंनी रस्त्यावरच विविध खेळ खेळून अनोख्या पद्धतीने आंदोलन केले. या आंदोलनाला विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी उपस्थिती लावत आंदोलनाला पाठिंबा दिला. आमदार संग्राम जगताप, आमदार सुधीर तांबे, माजी आमदार अनिल राठोड आदींनी आंदोलकांची भेट घेतली. भाजपचे अभय आगरकर यांनी यावेळी क्रीडा मंत्री विनोद तावडे यांच्याशी दूरध्वनी वरुन चर्चा घडवून क्रीडा अधिकाऱ्यांची चौकशी करुन कारवाईचे आश्वासन दिले. जिल्हा क्रीडा अधिकारी नावंदे मंत्री विनोद तावडे यांचा धाक दाखवून मनमानी कारभार करतात, असा आरोप करत त्यांच्या बदलीची मागणी यावेळी करण्यात आली.