महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना काळे झेंडे दाखवून निषेध - पालकमंत्री

अहमदनगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या ताफ्यासमोर काळे झेंडे फडकावत शिवराष्ट्र सेनेच्या कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला.

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना काळे झेंडे दाखवून निषेध
पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना काळे झेंडे दाखवून निषेध

By

Published : Jan 26, 2021, 10:32 AM IST

अहमदनगर - जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ ध्वजारोहणासाठी शहरात आले असता शिवराष्ट्र सेनेच्या कार्यकर्त्यांच्या नाराजीचा सामना त्यांना करावा लागला. या कार्यकर्त्यांनी मुश्रीफ यांच्या ताफ्यासमोर काळे झेंडे फडकावत निषेध व्यक्त केला.

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना काळे झेंडे दाखवून निषेध

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे जिल्ह्याकडे लक्ष नसल्याचा आरोप या कार्यकर्त्यांनी केला आहे. अहमदनगरमध्ये अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. पालकमंत्र्यांचे याकडे लक्ष नसल्याचा आरोप करत या कार्यकर्त्यांनी त्यांच्या ताफ्यासमोर काळे झेंडे फडकावले. पालकमंत्र्यांचा ताफा कार्यक्रमस्थळी जात असताना या मार्गावर लालटाकी परिसरात काळे झेंडे दाखवले. अचानक झालेल्या या प्रकाराने पोलिसांची एकच तारांबळ उडाली. याविषयी कोणतीही सूचना किंवा माहिती पोलिसांना नव्हती. या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवल्यानंतर तेथून पोबारा केला.

हेही वाचा -'सत्तेसाठी सत्य सोडणाऱ्यांच्या विरोधात माझे आंदोलन'

ABOUT THE AUTHOR

...view details