महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोपरगावात मान्सून पुर्व पावसाची हजेरी; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा - Climate

उन्हाचा पारा 40 डिग्रीपर्यंत पोहचलेला असल्याने या पावसामुळे नागरिकांना मात्र दिलासा मिळाला आहे.

कडाक्याच्या उन्हाळ्यात अचानक आलेल्या पावसाचा आनंद लुटताना बच्चे कंपनी

By

Published : Jun 3, 2019, 10:30 AM IST

अहमदनगर- राज्यासह संपूर्ण देशात उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत असताना अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरात रविवारी दुपारी मान्सून पुर्व पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून थोडाफार दिलासा मिळाला आहे.

कडाक्याच्या उन्हाळ्यात अचानक आलेल्या पावसाचा आनंद लुटताना बच्चे कंपनी

उन्हाचा पारा 40 डिग्रीपर्यंत पोहचलेला असल्याने या पावसामुळे नागरिकांना मात्र दिलासा मिळाला आहे. अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

अचानक आलेल्या पावसामध्ये लहान मुलांनी या पहिल्या पावसाचा आनंद लुटला. तसेच वातावरणात गारवादेखील निर्माण झाला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details