मुंबई -कोरोनाआधी देशविदेशातून 1 कोटी 70 लाख भाविक शिर्डीत येत होते. असल्याने साईंची झोळीतही 400 ते 500 कोटी एवढे दान भाविकांकडून मिळत होते. कोरोनामुळे साई मंदिर बंद असल्याने 50 कोटी रुपयांची महिन्याकाठी होणारी उलाढाल पूर्णतः थांबली आहेत. नुकतेच, राज्य सरकारने मंदीरे खुली करण्याची परवानगी दिल्याने शिर्डीतील विस्कटलेली आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल अशी आशा आहे.
साईंची शिर्डी : कोरोनापूर्वी आणि नंतरची - शिर्डी बातमी
कोरोना महामारीमुळे साई मंदिर भाविकांसाठी बंद करण्यात आले होते. मंदिर बंद असल्याने भाविक शिर्डीत येत नाही. यामुळे साई संस्थानला मिळणाऱ्या देणगीला मोठा फटका बसला आहे. लवकरच मंदिरे सुरू होणार असल्याने व्यावसायिकांना दिलासा मिळणार आहे.
कोरोना महामारीमुळे साई मंदिर भाविकांसाठी बंद करण्यात आले होते. मंदिर बंद असल्याने भाविक शिर्डीत येत नाही. यामुळे साई संस्थानला मिळणाऱ्या देणगीला मोठा फटका बसला आहे. तसेच भाविकांवर अवलंबून असणारे शिर्डीतील सातशे ते आठशे हॉटेल, प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाड्या यासह अनेक व्यवसाय ठप्प झाले आहेत. लवकरच मंदिरे सुरू होणार असल्याने व्यावसायिकांना दिलासा मिळणार आहे.
साईंच्या खजिन्यात घट
कोरोनाच्या संकटात कोरोनाचा प्रादुर्भाव होवू नये यासाठी साईबाबा समाधी मंदीर भाविकांसाठी बंद करण्यात आले आहे. साईच्या दर्शनासाठी वर्षभरात दीड कोटी भक्त शिर्डीला येतात. यात ऑनलाईन चेक, डिडी आणि मौल्यवान वस्तू यांचा समावेश आहे. शिर्डीच साईमंदीर हे आंतराष्ट्रीय दर्जाचे आहे. दरवर्षी तीनशे ते चारशे कोटी देणगी मिळते. मात्र, यात आता घट झाली आहे.
हे खर्च भागतात
कर्मचाऱ्यांचे पगार, भाविकांनासाठी मोफत प्रसादालय, श्री साईनाथ रुग्णालय, पंचक्रोशीतील मुलांसाठी साईनाथ कन्या विद्यामंदिर त्याचबरोबर ज्युनियर कॉलेज, स्वच्छता, यासाठी हे खर्च भागले जातात. उत्पन्नात मोठी घट येत असल्याने साई संस्थानने केलेल्या एफ डी च्या व्याजातून साई संस्थानला खर्च भागवला. शिर्डीच्या कोविड सेंटरमध्ये 8000 रुग्णांवर मोफत उपचार केले आहेत. दोन हजार कोटी रुपयांची रक्कम बँकेत डिपॉझिट आहे. त्याच बरोबर 500 किलो सोने, आणि 5 हजार किलो चांदी आहे.
हेही वाचा -Ria Dabi UPSC Qualifies : 2015 बॅचची IAS टॉपर टीना डाबीची बहिण रिया डाबीचे UPSC परीक्षेत नेत्रदीपक यश