अहमदनगर - जिल्ह्यात दुष्काळामुळे या वर्षी फळउत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची मागणी 'एसबीआय जनरल इन्शुरन्स' कडे केली होती. परंतु काही मोजक्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळाली असून इतर शेतकरी मात्र यापासून वंचित राहिले आहेत. त्यामुळे प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी अर्धनग्न आंदोलन करण्यात आले.
शेतकऱ्यांच्या पैशासाठी प्रहार जनशक्ती पक्षाने अर्धनग्न आंदोलन - शेतकरी
अहमदनगर जिल्ह्यातील फळउत्पादक शेतकऱ्यांना 'पंतप्रधान फळपीक विमा योजनेचे' पैसे न मिळाल्याने पुण्यातील 'एसबीआय जनरल इन्शुरन्स'च्या कार्यालयाबाहेर 'प्रहार जनशक्ती पक्षाने' अर्धनग्न आंदोलन करत कार्यालयाची प्रतिकात्मक पुजा केली.
अहमदनगर जिल्ह्यातील 17 हजार 975 फळउत्पादक शेतकऱ्यांनी सन 2018 मध्ये फळपीक विमा योजनेकरिता सात कोटींचा विमा हप्ता भरला होता. पण यावर्षी दुष्काळचे प्रमाण तीव्र होते. याचा फटका संत्री, डांळीब, चिकू या फळबागांना बसल्याने बागा अक्षरशा उखडून टाकण्यात आल्या. त्यामुळे शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची मागणी 'एसबीआय जनरल इन्शुरन्स'कडे केली. पण कंपनीकडून काही मोजक्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळाली. मात्र मोठ्या प्रमाणात अजूनही काही शेतकऱ्यांना विम्याची रक्कम मिळाली नसल्याने, या वंचित शेतकऱ्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने अर्धनग्न आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी इन्शुरन्स कार्यालयाची प्रतिकात्मक पूजा करून अधिकाऱ्यांचा निषेध केला.