अहमदनगर - शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळावे, या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेवर अर्धनग्न मोर्चा काढण्यात आला. विम्याचे पैसे दिले नाही तर अधिकाऱ्यांना नग्न करणार असल्याचा इशाराही यावेळी आंदोलकांनी दिला. दरम्यान यावेळी आदोलकांनी बँकेच्या प्रवेशद्वाराजवळ पूजा करून बँक अधिकाऱ्यांना सद्बुद्धी द्यावी, अशी मागणी देवाकडे केली.
पीक विम्यासाठी प्रहार संघटना आक्रमक; जिल्हा बँकेवर काढला अर्धनग्न मोर्चा - district bank
शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळावे, या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेवर अर्धनग्न मोर्चा काढण्यात आला. विम्याचे पैसे दिले नाही तर अधिकाऱ्यांना नग्न करणार असल्याचा इशाराही यावेळी आंदोलकांनी दिला.
पीक विम्यासाठी प्रहार संघटनेचा अर्धनग्न मोर्चा
सलग ३ वर्ष दुष्काळ असल्याने शेतकरी आधीच मेटाकुटीला आला आहे. त्यातच पाऊस न पडल्याने शेतकरी मोठ्य़ा अडचणीत सापडला आहे. अनेकदा मागणी करूनही शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे दिले जात नसल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केले आहे. यापुढील काळात पीक विम्याचे पैसे मिळाले नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळेही प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.