अहमदनगर - चीनसह इतर देशांमध्येही कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. मात्र, कोरोनामुळे राज्यातील पोल्ट्री व्यवसाय मोठ्या संकटात सापडला आहे. व्हॉट्सअॅपवर व्हायरल झालेल्या अफवा याला कारणीभूत आहेत. चिकन आणि अंडी खाल्ल्यामुळे कोरोनाची लागण होत असल्याचे चुकीचे मेसेज सोशल मीडियावर फिरल्यामुळे त्याचा परिणाम पोल्ट्री व्यावसायिकांवर झाला आहे. अहमदनगर जिल्ह्यात एका महिन्यात ६०० कोटींचा फटका व्यावसायिकांना बसला आहे.
कोरोना : अहमदनगरमध्ये एका महिन्यात पोल्ट्री व्यवसायाचे ६०० कोटींचे नुकसान - corona positive india
चिकन आणि अंडी खाल्ल्यामुळे कोरोनाची लागण होत असल्याचे चुकीचे मेसेज सोशल मीडियावर फिरल्यामुळे त्याचा परिणाम पोल्ट्री व्यावसायिकांवर झाला आहे. अहमदनगर जिल्ह्यात एका महिन्यात ६०० कोटींचा फटका व्यावसायिकांना बसला आहे.
कोरोनाच्या अफवांमुळे पोल्ट्री फार्मचा व्यवसाय धोक्यात आला आहे. राज्यात अनेक शेतकऱ्यांनी शेतीला पर्याय म्हणून कुक्कुटपालन सुरू केले आहे. राज्यातील शेतकरी आधीच संकटात असताना सोशल मीडियावरील चुकीच्या व्हायरल पोस्टमुळे अधिकच संकटात सापडला आहे. अनेक शेतकऱ्यांनी बँकेकडून कर्ज घेऊन शेड उभारले, पिल्ले वाढवली. मात्र, कोरोनाची एक चुकीची पोस्ट व्हायरल झाली आणि शेतकऱ्याचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. अहमदनगर जिल्ह्यात सरासरी १४ तालुक्यात २०० फार्म असून एक कोटी बारा लाख पक्षी आहेत. ७० रुपये असणारा भाव आज फक्त ७ रुपयांवर येऊन ठेपलाय. यामुळे जिल्ह्यातील व्यावसायिकांना सुमारे एकाच महिन्यात ६०० कोटी रुपयांचा फटका बसला आहे.