महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पिंपळगावमध्ये टँकरद्वारे दुषित पाणीपुरवठा, ग्रामस्थांची नाराजी

पिंपळगाव देपा परीसरात पाणी पुरवठा करण्यासाठी प्रवरा नदीलगतच्या विहिरीवरुन टँकरने पाणी आणले जाते. हे पाणी भरत असतानाच पाणी फेसाळत असल्याचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. त्यामुळे या विहिरीचे पाणी पिण्यासाठी योग्य आहे की अयोग्य यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

पिंपळगावमध्ये टँकरद्वारे दुषित पाणीपुरवठा

By

Published : May 7, 2019, 5:43 PM IST

Updated : May 7, 2019, 6:50 PM IST

अहमदनगर - दुष्काळात पाण्यासाठी होरपळणाऱ्या जनतेला दिलासा देण्यासाठी शासनाने टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला. परंतु, या टँकरद्वारे दूषित पाणीपुरवठा होत असल्याने दुष्काळी जनतेच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचे दिसून येत आहे.

पिंपळगावमध्ये टँकरद्वारे दुषित पाणीपुरवठा

संगमनेर तालुक्याच्या पठार भागात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्याने या भागाला टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. तालुक्यातील पिंपळगाव देपामधील २०० लोकवस्तीच्या गोकूळवाडी आणि सुतारवाडीत आलेल्या टँकरमधून ग्रामस्थ पाणी भरत आहेत. परंतु, या पाण्याचा मोठ्या प्रमाणात फेस होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी या दूषित पाणी पुरवठ्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

पिंपळगाव देपा परीसरात पाणी पुरवठा करण्यासाठी प्रवरा नदीलगतच्या विहिरीवरुन टँकरने पाणी आणले जाते. हे पाणी भरत असतानाच पाणी फेसाळत असल्याचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. त्यामुळे या विहिरीचे पाणी पिण्यासाठी योग्य आहे की अयोग्य यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे टँकर भरताना दूषित पाणीपुरवठा होत असतानादेखील याची कोणतीही माहिती संबंधितांनी प्रशासनाला देण्यात आले नाही. उलट टँकर भरून त्याद्वारे इच्छित स्थळी पाणी पुरवठा केला गेला आहे.

प्रवरा नदीकाठी दोन पाणी योजनांच्या विहिरी आहेत. या विहिरीलगतच गटारीचे पाणीदेखील नदीपात्रात सोडण्यात आले आहे. त्याचा पाझरदेखील लगतच्या विहिरींमध्ये होत असल्याच्या तक्रारी परिसरातील नागरिकांच्या आहेत. शासकीय टँकरकडून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असताना प्रशासन मात्र याबाबत अनभिज्ञच असल्याचे समोर आले आहे.

Last Updated : May 7, 2019, 6:50 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details