महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राधाकृष्ण विखे पाटलांच्या भाजप प्रवेशानंतर उत्तर नगरमध्ये राजकीय समीकरणे बदलण्यास सुरुवात

विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रेवश केल्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील अनेक नेते भाजपमध्ये येण्यासाठी आपल्या संपर्कात आहेत, असे वक्तव्य राधाकृष्ण विखे-पाटील यांनी काही दिवसांआधी केले होते. आता राष्ट्रवादीचे नेते मधुकर पिचड आणि त्यांचे पुत्र वैभव पिचड यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने विखेंचे वक्तव्य खरे होताना दिसत आहे.

By

Published : Aug 1, 2019, 8:56 AM IST

Updated : Aug 1, 2019, 9:29 AM IST

राजकीय समीकरण

अहमदनगर - राधाकृष्ण विखे-पाटील यांनी भाजपमध्ये प्रेवश केल्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील अनेक नेते भाजपमध्ये येण्यासाठी आपल्या संपर्कात आहेत, असे वक्तव्य विखे पाटलांनी काही दिवसांआधी केले होते, ते आता खरे होताना दिसत आहे. दिग्गज नेत्यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोडून भाजपमध्ये येण्याचा धडाका लावला आपल्याल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

राजकारणाचे विविध रुपं


राष्ट्रवादीचे नेते मधुकर पिचड आणि त्यांचे पुत्र वैभव पिचड यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने अकोले तालुक्याबरोबरच जिल्ह्याच्या राजकारणातही बदल झाला आहे. पिचडांच्या भाजपप्रवेशानंतर ही जागा भाजपकडे जाण्याची चिन्हे आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून पिचडांना विरोध करणारे भाजपचे स्थानिक नेते अशोक भांगरे आणि किरण लहामटे यांची मोठी अडचण झाली असून हे कार्यकर्ते भाजप सोडणार असल्याचे चित्र सध्या निर्मण झाले आहे. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडून उमेदवारी करु पाहणाऱ्या लहामटे यांनी राष्ट्रीवादीशी जवळीक साधण्यास सुरवात केली आहे. तर, भांगरे सध्या शांत आहेत. आगामी निवडणुकीत पिचडांच्या विरोधात हे नेते एकमूठ बांधण्यात यशस्वी होतात का? हेही महत्त्वाचे असणार आहे.


विधानसभा निवडणुकीत युती करुन निवडणूक लढणार असल्याचे भाजप नेते सांगत आहेत. असे असले तरी भाजपच्या गोटातीलच राधाकृष्ण विखे पाटलांचे मेव्हणे राजेश परजणे यांनी आत्ता कोपरगावमधून विधानसभा निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे. कोणत्या पक्षातर्फे निवडणूक लढविणार हे येत्या काही दिवसात स्पष्ट होणार असले तरी निवडणुकीच्या चर्चा आता रंगण्यास सुरुवात झाली आहे.


अहमदनगर जिह्यातील राजकीय घराण्यात निवडणुकीनिमित्ताने कधी लढाई तर कधी दिलजमाई बघावयास मिळाली आहे. आता भाजपमध्ये जिल्ह्यातील विखे, पिचड आणि कोल्हे घराण्यांनेही प्रवेश केलेला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीतही जिल्ह्यातील सर्व जागा युतीच्याच निवडणून आणण्याचा विडा विखे-पाटलांनी उचलला आहे. यातच विखेंचे कट्टर विरोधक समजले जाणारे बाळासाहेब थोरात यांचे भाचे युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे हे राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात शिर्डी विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढविणार असल्याची चर्चाही सध्या जोरात सुरु आहे. तर, बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात विखे-पाटील यांच्या पत्नी आणि जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनी विखे-पाटील या संगमनेर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याची चर्चा होत आहे.


श्रीरामपूर, नेवासा, राहुरी या तीन विधानसभा मतदारसंघातील राजकीय परस्थिती सध्या शांत आहे. श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार भाऊसाहेब कांबळे तर नेवासा येथील गडाख आणि राहुरीचे तनपुरे हे पुढील काळात काय भूमिका घेणार याकडेच सर्वांचे लक्ष लागून आहे.

Last Updated : Aug 1, 2019, 9:29 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details