महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जामखेडच्या जातेगावमध्ये अफूची शेती; ५६ किलो झाडे पोलिसांकडून जप्त - jamkhed police station

जामखेड तालुक्यातील जातेगाव येथे एका शेतकऱ्याने शेतात अफूची लागवड केली होती. पोलिसांनी कारवाई करत 56 किलो अफूची झाडे जप्त केली आहेत.

afu tree
जातेगावमध्ये ५६ किलो अफूची झाडे

By

Published : Feb 26, 2021, 5:37 PM IST

अहमदनगर - जामखेड तालुक्यातील जातेगाव येथे एका शेतकऱ्याने शेतात अफूची लागवड केली होती. ही गुप्त माहिती जामखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना मिळाली. त्यावरून त्यांनी पथकासह छापा टाकला असता १ लाख ७० हजार रुपये किमतीचो ५६ किलो वजनाची अफूची झाडे पोलिसांनी जप्त केले. आरोपी विरूद्ध अमली औषधे द्रव्य व मन प्रभावी पदार्थ अधिनियम सन १९८५ चे कलम १५ क प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.

जामखेडच्या जातेगावमध्ये ५६ किलो अफूची झाडे पोलिसांनी केली जप्त

गुप्त खबऱ्याच्या माहितीवरून कारवाई-

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गुरुवारी पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना गुप्त बातमी दाराकडून माहिती मिळाली की तालुक्यातील जातेगाव येथे आरोपी वासुदेव महादेव काळे (वय ३९ रा. जातेगाव ) याने स्वतःचे मालकीचे गट नंबर १०७७ मध्ये अफूची लागवड केली आहे. या माहितीवरून तहसीलदार विशाल नाईकवाडे, पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, सहायक फौजदार विठ्ठल गायकवाड, संजय लाटे, संदीप आजबे, संग्राम जाधव, विजयकुमार कोळी, अविनाश ढेरे, आबासाहेब आवारे, संदीप राऊत, सचिन पिरगळ, हनुमान आरसुळ यांचे पथक जातेगाव येथे गुरुवारी रात्री आठ वाजता दाखल झाले.

सदर पथकाने आरोपी वासुदेव काळे यांच्या शेतात छापा टाकला असता त्यामध्ये १ लाख ६९ हजार ८१५ रुपये किंमतीची ५६ किलो ग्रॅम वजनाचे अफूचे झाडे आढळून आली. पोलिसांनी त्याचा पंचनामा करून आरोपीला अटक केली. याबाबत जामखेड पोलिसात संजय लाटे यांनी तक्रार दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details