अहमदनगर (शिर्डी)- आज 31 डिसेंबरच्या रात्री शिर्डी शहरात आणि साईमंदीर परिसरात गर्दी नियंत्रणासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.(Police Security Sai Mandir Area) रात्री 9 वाजेनंतर साईबाबा मंदीरातील आतील बाजू व मंदिर गाभाऱ्यामध्ये साईभक्तांना प्रवेश दिला जाणार नाही. याच बरोबरीने द्वारकामाई आणि चार नंबर गेट परीसरात भक्तांची गर्दी होवू नये यासाठीही पोलीसांनी कंबर कसली आहे.
प्रतिक्रिया देताना पोलीस अधिकारी अतिरिक्त पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहेत
शिर्डीत चालू वर्षाला निरोप देण्यासाठी नवीन वर्षाचे स्वागत साईंच्या दर्शनाने करण्यासाठी शिर्डीत भाविकांची होणारी संभाव्य गर्दी होत असते. मात्र, या वर्षी कोरोना नियमांतर्गत रात्री नऊ ते सकाळी सहा पर्यंत जमावबंदी करण्यात आली असल्याने रात्री साई मंदीर 9 ते सकाळी 6 वाजे पर्यंत बंद रहाणार आहे. तरीही शिर्डी शहरात तसेच साईमंदीर परिसराच्या बाहेर मोठी गर्दी होवू शकते. या पार्श्वभूमीवर गर्दी नियंत्रणासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अतिरिक्त पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहेत.
संस्थानच्या वतीने भाविकांना ध्वनीक्षेपकाद्वारे सुचना देण्यात आलेल्या आहेत
शिर्डी शहारात पोलीस विभागामार्फत बाहेरील पो. स्टे. चे 24 अधिकारी तसेच 310 पोलीस अंमलदार (महिला 60 व 250 पुरुष) शिर्डी विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांचे नियंत्रणाखाली बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. आज (दि. 31 डिसेंबर)रोजी रात्री साईभक्तांची तसेच ग्रामस्थांची मोठया प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. संस्थानच्या वतीने भाविकांना ध्वनीक्षेपकाद्वारे सुचना देण्यात आलेल्या आहेत. तसेच, रात्रौ 9 वाजेनंतर साईबाबा मंदीरातील आतील बाजु व मंदिर गाभारा यामध्ये साईभक्तांना प्रवेश दिला जाणार नाही.
साईभक्तांनी आणि ग्रामस्थांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन
संस्थानच्या संरक्षण विभागामार्फत मंदिराचे सर्व प्रवेशव्दार या ठिकाणी संरक्षण अधिकारी यांनी सुरक्षा अधिकारी, सुरक्षा सुपरवायझर, सुरक्षा रक्षकामार्फत परिसरात पेट्रोलींग केल जाणार असून साईंमदीराच्या महाद्वार समोर, द्वारकामाई चावडी समोर जमाव होणार नाही. याची दक्षता पोलिसांकडून घेण्यात येत आहे. शिर्डीत येणाऱ्या रसत्यावर चेक पाॅईट लावून येणाऱ्या भक्तांच्या गाड्यांना नियम पाळण्याच्या सुचना दिल्या जात आहेत. साईभक्तांनी आणि ग्रामस्थांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन पोलीस प्रशासनांकडून करण्यात आले आहे.
हेही वाचा -Home Minister On New Year : नवीन वर्षाचे स्वागत करायचे असेल तर नियम पाळा - गृहमंत्री दिलीप वळसे पाटील