महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गांजाच्या शेतावर पोलिसांचा छापा, 110 गांजाची झाडे जप्त - 5 लाखांचा गांजा जप्त मांडवगण

जिल्ह्यातील श्रीगोंदे तालुक्यातील मांडवगण येथे पोलिसांनी गांजाच्या शेतीवर छापा टाकला आहे. या छाप्यात पोलिसांनी शेतातील 110 गांजाची झाडे जप्त केली आहेत. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून, रामदास गेनू रायकर असं आरोपीचं नाव आहे. दरम्यान जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत 5 लाख 40 हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

गांजाच्या शेतावर पोलिसांचा छापा
गांजाच्या शेतावर पोलिसांचा छापा

By

Published : May 17, 2021, 7:33 PM IST

अहमदनगर - जिल्ह्यातील श्रीगोंदे तालुक्यातील मांडवगण येथे पोलिसांनी गांजाच्या शेतीवर छापा टाकला आहे. या छाप्यात पोलिसांनी शेतातील 110 गांजाची झाडे जप्त केली आहेत. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून, रामदास गेनू रायकर असं आरोपीचं नाव आहे. दरम्यान जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत 5 लाख 40 हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

या प्रकरणाबद्दल मिळालेली माहिती अशी की, रामदास गेनू रायकर याने मांडवगण येथील गट नंबर 456/12 मधील शेतात मोठ्या प्रमाणावर गांजाच्या झाडांची लागवड केली आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी संबंधित शेतात छापा टाकला, या छाप्यामध्ये गांजाची 110 झाडे आढळून आली. या झाडांचे एकूण वज हे 54 किलो असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

हेही वाचा -वादळाच्या संकटात 65 वर्षांचे आजोबा बनले कुटुंबाची ढाल, जीव धोक्यात घालून वाचवले नातवाला

ABOUT THE AUTHOR

...view details