अहमदनगर :कोपरगाव शहरातील टाकळी फाटा शिवारातील जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाचे कर्मचारी व कोपरगाव शहर पोलिसांच्या पथकाने संयुक्तरित्या छापा (Police raid gambling den in Kopargaon) टाकून जुगार अड्डा उद्ध्वस्त केला. यामध्ये २८ जणांना ताब्यात घेण्यात (28 gamblers arrested) आले असून वाहनांसह साडे २३ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केल्याची माहिती पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी दिली आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.
तिरट नावाचा हार-जीतचा जुगार खेळाची कुणकुण लागली -जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला यांच्या आदेशाने अहमदनगर जिल्ह्यातील ठिकठिकाणी अवैध धंद्यांवर कारवाई केल्या जात आहे. त्यातच स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगरचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना माहिती मिळाली की कोपरगाव तालुक्यातील टाकळी फाटा धोंडीबा नगर येथे एका इमारतीच्या टेरेसवर काही इसम पैशावर खेळला जाणारा तीन पत्त्याचा तिरट नावाचा हार-जीतचा जुगार खेळतात अशी गुप्त बातमीदार मार्फत माहिती मिळाल्यावर पो.नि. कटके यांना मिळाली.