अहमदनगर- वाळू तस्करीला विरोध केल्याने जिल्ह्याच्या कर्जत तालुक्यातील मलठण गावचे पोलीस पाटील विजय भिसे यांच्यावर पाठलाग करून हल्ला केल्याची घटना घडली आहे. यावेळी त्यांच्या मोटारसायकलचीही नासधूस करण्यात आली. असाच प्रकार रातजन या ठिकाणीही घडला असून ग्रामपंचायत सदस्याला मारहाण झाली आहे. वाळू तस्करांच्या या हैदोसाचा निषेध म्हणून शुक्रवारी मलठण, रातजन गावच्या ग्रामस्थांनी कर्जत तहसीलदार कार्यालय आणि पोलीस ठाणे गाठून धरणे आंदोलन केले. पोलीस-प्रशासनाने कारवाईचे आदेश दिले असले तरी महसूल आणि पोलीस विभागाच्या सोयीस्कर दुर्लक्षामुळेच वाळू तस्करांची मजल वाढल्याचा आरोप होत आहे.
कर्जतच्या मलठन गावात वाळू तस्करांची दादागिरी... पोलीस पाटलाला मारहाण - ahmednagar
मलठण गावच्या शिवारातून सीना नदी वाहते. येथील पर्यावरणवादी सामाजीक कार्यकर्ते पोपट आबा खोसे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून वाळू उपशाला विरोध करून पर्यावरणाचे महत्व ग्रामस्थांना पटवून दिले असल्याने या भागातील सीना नदी पात्रात मुबलक वाळूसाठा आहे. मात्र,आता या वाळूसाठ्यावर तस्करांची नजर पडली आहे.
मलठण गावच्या शिवारातून सीना नदी वाहते. येथील पर्यावरणवादी सामाजीक कार्यकर्ते पोपट आबा खोसे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून वाळू उपशाला विरोध करून पर्यावरणाचे महत्व ग्रामस्थांना पटवून दिले असल्याने या भागातील सीना नदी पात्रात मुबलक वाळूसाठा आहे. मात्र, या वाळूसाठ्यावर तस्करांची नजर पडली. अवैधपणे वाळूचा उपसा करण्यासाठी काही गुंड एका डंपरसह नदी पात्रात आली होती. ही बाब पोलीस पाटील विजय भिसे यांना समजताच त्यांनी घटनास्थळी जाऊन वाळू तस्करांना विरोध केला. तसेच पळून जाणाऱ्या डंपरचा पाठलाग केला. यावेळी वाळू तस्कर भिसे यांच्यावर चाल करून आले आणि त्यांनी भिसे यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. भिसे यांनी तेथून कसाबसा जीव वाचवून एका घरात आश्रय घेतला. यावेळी वाळू तस्करांनी भिसे यांच्या मोटारसायकलची मोडतोड केली. यासर्व घटनेचा निषेध म्हणून मलठण गाव आता एकवटले असून गावकरी वाळू तस्करांचा पोलीस-महसूल प्रशासनाने बंदोबस्त करावा यासाठी आंदोलन करत आहेत.