अहमदनगर - भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई यांना शिर्डीच्या प्रांत अधिकाऱ्यांनी 8 डिसेबर ते 11 डिसेंबर पर्यंत शिर्डीत येण्यास बंदी घातली आहे. याबाबतची नोटीसही त्यांना बजावण्यात आली आहे. मात्र तो आदेश न मानत देसाईंनी शिर्डीत येण्याची तयारी केली आहे. आज सकाळी त्या पुण्याहुन शिर्डीसाठी निघाल्या आहेत. मात्र, त्यांना शिर्डीमध्ये रोखण्यात येणार असल्याचे शिर्डीकरांनी आधीच जाहीर केल आहे. या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुवव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ नये म्हणून पोलिसांनीही शिर्डीतील कुमक वाढवली आहे.
पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात शिर्डी साई मंदिरात भक्तांसाठी लागू करण्यात आलेल्या ड्रेसकोडचा वाद शिगेला पोहोचला आहे. ड्रेसकोडवर आक्षेप घेणाऱ्या व बोर्ड हटवण्याचा इशारा देणाऱ्या तृप्ती देसाई यांना शिर्डीत येण्यास शिर्डीच्या प्रांताधिकाऱ्यांनी प्रवेशबंदी केली आहे. असे असले तरी तो आदेश धुडकावून शिर्डीत येण्याची तयारी देसाई यांनी केली आहे. तर दुसरीकडे देसाई यांनी शिर्डीत येण्याचा प्रयत्न केल्यास त्या विरोधात कायदेशीर कार्यवाही करण्याची तयारी प्रशासनाने केली आहे.
तृप्ती देसाईंना रोखण्यासाठी पोलीस बंदोबस्त आज सकाळी साठे आठ वाजता ब्राम्हण महासंघाचे कार्यकर्ते शिर्डीत एकत्र आले आहेत. त्यानंतर साई मंदिराला एक फेरी मारणार आहेत. देसाई शिर्डीत आल्यास ब्राम्हण महासंघाबरोबरच शिर्डी शिवसेना महिला आघाडीच्या महिलांनीही त्यांना विरोध करण्याची तयारी केली आहे. सकाळी 9 वाजता शिवसेनेच्या महिला द्वारकामाई समोर एकत्र येणार आहेत. या पार्श्वभूमीवर शिर्डीत येणाऱ्या सर्व सीमेवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यामध्ये एक अॅडीशनल एस पी, तीन डीवायएसपी, तीन पोलीस निरीक्षक, तीन पीएसआय, आणि पोलीस कर्मचारी इसा शंभर पोलिसांची फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
तृप्ती देसांईना सीमेवरच रोखण्यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात ..तर आम्ही जल्लोष करणार- ब्राम्हण महासंघ
शिर्डीत येऊन संस्थानने लावलेले फलक काढणारच अशी भूमिका भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी घेतल्याने त्यांना विरोध करण्यासाठी ब्राम्हण महासंघाच्या महिला शिर्डीत दाखल झाल्या असून तृप्ती देसाई यांनी फलक काढण्याचे धाडस करू नये, त्या शिर्डीत आल्यातर आम्ही त्यांना फलकापर्यंत पोहोचू देणार नाही आणि त्या येवू शकल्या नाहीत, तर आम्ही जल्लोष साजरा करणार, असे ब्राम्हण महासंघाचे आनंद दवे म्हणाले आहेत. आता ब्राम्हण महासंघाचे कार्यकर्ते शिर्डीत एकत्र जमले असुन साई मंदीराला एक फेरी मारणार आहेत.