महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बालविवाह करून अल्पवयीन मुलीचा विवाहानंतर छळ; तक्रारीनंतर आई-वडिलांसह सासू-सासऱ्यांविरोधात गुन्हा

विविध कारणांनी पती, सासू व सारे यांनी शिवीगाळ करून मारहाण केल्याचे पीडितेने पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. पीडितेने माहेरी गेल्यानंतर ही सर्व बाब तिच्या आजोबांना सांगितली. त्यानंतर त्यांच्यासह पीडितेने पोलिसात जाऊन तक्रार दाखल केली.

नेवासा पोलीस स्टेशन
नेवासा पोलीस स्टेशन

By

Published : Sep 16, 2021, 8:54 PM IST

Updated : Sep 16, 2021, 10:46 PM IST

नेवासा (अहमदनगर) - नेवासा तालुक्यात बालविवाह करून अल्पवयीन मुलीचा छळ करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पीडितेने नेवासा पोलिसात तक्रार दिली. त्यानंतर पीडितेची आई, मावशी व काका यांचेसह नवरा, सासू-सासरा व आई-वडील यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

पीडितेच्या तक्रारीप्रमाणे ती नेवासा फाटा येथील शाळेत शिक्षण घेत होती. तिच्या संमतीशिवाय आई, मावशी, काका यांनी 24 मे 2021 रोजी नेवासा तालुक्यातील माळीचिंचोरा येथील तरुणाशी विवाह करून दिला. त्या ठिकाणी अल्पवयीन असताना व काहीही कल्पना देता विवाह करून देण्यात आल्याची पीडितेची तक्रार आहे.

तक्रारीनंतर आई-वडिलासंह सासू-सासऱ्यांविरोधात गुन्हा

हेही वाचा-गुजरात: भूपेंद्र पटेल मंत्रिमंडळात 'या' नेत्यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ; जुन्या सर्व मंत्र्यांना वगळले!

लग्नाच्या अगोदर पीडितेच्या आईने पीडितेला मावशीचे घरी नेऊन ठेवले होते. तेथूनच तिचा विवाह करून दिला होता. ही बाब पीडितेच्या आजोबांना नव्हती. लग्नानंतर पीडितेच्या इच्छेविरोधात पतीने शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर विविध कारणांनी पती, सासू व सारे यांनी शिवीगाळ करून मारहाण केल्याचे पीडितेने पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. पीडितेने माहेरी गेल्यानंतर ही सर्व बाब तिच्या आजोबांना सांगितली. त्यानंतर त्यांच्यासह पीडितेने पोलिसात जाऊन तक्रार दाखल केली.

हेही वाचा-Time Influential List: टाईमच्या जगातील 100 प्रभावशाली लोकांच्या यादीत मोदी, ममता बॅनर्जी अन् आदर पूनावाला

पीडित मुलीच्या तक्रारीवरून नेवासा पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम 376 (एन), बालकाचे लैंगिक आत्याचारापासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 3 व 4, बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 कलम 9, 10, 11, महाराष्ट्र नरबळी, इतर अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोना यांना प्रतिबंध घालणेबाबत व त्याचे समूळ उच्चाटन करणे या कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पीडितेची आई, मावशी व काकासह पती, सासू व सासरे तसेच खरवंडी, मांजरी येथील देवलाशी या सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विजय ठाकूर करीत आहेत.

हेही वाचा-बिहारमध्ये दोन मुले अचानक झाले अब्जाधीश; बँक खात्यात 960 कोटींहून अधिक रक्कम जमा

Last Updated : Sep 16, 2021, 10:46 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details