महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jan 29, 2022, 10:08 PM IST

Updated : Jan 29, 2022, 10:32 PM IST

ETV Bharat / state

अहमदनगर पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलीस कर्मचाऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

पोलीस कर्मचाऱ्याने आज (29 जानेवारी) सायंकाळच्या सुमारास अहमदनगर पोलीस अधीक्षक कार्यालयात आल्यानंतर इमारतीच्या मधल्या पोर्चमध्ये गृहविभागाचे पोलीस उपअधीक्षक कार्यल्यासमोरच अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला.

police employee
आत्मदहनाचा प्रयत्न करणारा पोलीस

अहमदनगर -पोलीस कर्मचाऱ्याने आज (29 जानेवारी) सायंकाळच्या सुमारास अहमदनगर पोलीस अधीक्षक कार्यालयात (Ahmednagar SP Office) आल्यानंतर इमारतीच्या मधल्या पोर्चमध्ये गृहविभागाचे पोलीस उपअधीक्षक कार्यल्यासमोरच अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. जितेंद्र उर्फ हरिभाऊ मांडगे असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर पोलीस ठाण्यात ते रुजू होते.

पोलीस कर्मचाऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

पोलिसांची उडाली धावपळ -

यावेळी पोलीस अधीक्षक कार्यालयात उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात ही बाब आली. त्यानंतर सगळ्यांचीच धावपळ उडाली. कसलीही माहिती नसल्याने कर्मचारीही गडबडले, मात्र तातडीने उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आत्महदनाचा प्रयत्नात असलेल्या कर्मचाऱ्याकडे धाव घेत त्याला पेटवून घेण्यापासून दूर केले.

कौटुंबिक वादातून आत्मदहनाचा प्रयत्न -

याबाबत प्राथमिक माहितीनुसार, हा कर्मचारी पुणे पोलीस दलात शिक्रापूर परिसरात कार्यरत आहे. तो मूळचा नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील पिंपळी गवळी गावचा रहिवासी असून त्याचे पत्नीसोबत कौटुंबिक वाद आहेत, त्यातून पत्नीने नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील सुपा पोलीस ठाण्यात 2018 आणि नुकतेच 2022 ला तक्रारी दाखल केल्या असल्याने पोलीस त्याची चौकशी करत होते. याच नैराश्यातून त्याने हे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती पुढे येत आहे.

पोलीस असून पोलिसच त्रास देतायेत-

आपण पोलीस असून माझ्याच खात्यातील पोलीस चौकशीच्या नावाखाली मला मानसिक त्रास देत आहेत, अशी त्याची तक्रार आहे. मला एक तर गडचिरोलीला बदली करा अन्यथा मला फाशी द्या, असे तो पोलीस अधिकाऱ्यांना सांगत होता.

घटनेची चौकशी सुरू, गुन्हा दाखल-

पोलिसांनी त्याला शांत करून नंतर हद्दीतील भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात नेले. या घटनेबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. मात्र, एकूणच थेट पोलीस अधीक्षक कार्यालयात मध्यवर्ती ठिकाणी या पोलीस कर्मचाऱ्याने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. कालच राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील दिवसभर याच कार्यालयात भेटी निमित्ताने आले होते, यावेळी नाशिक परिक्षेत्राचे महानिरीक्षकसुद्धा उपस्थित होते, त्यानंतर दुसऱ्याच दिवशी याच ठिकाणी ही घटना घडल्याने मोठी चर्चा आहे.

Last Updated : Jan 29, 2022, 10:32 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details