अहमदनगर - पारनेर पोलिसांनी निघोज शिवारात छुप्या पद्धतीने सुरू असलेल्या अवैध दारू भट्टीवर कारवाई केली आहे. या कारवाईत 2 लाख 43 हजारांची गावठी दारू नष्ट केली. पारनेर पोलिसांनी निघोज दूर क्षेत्राच्या हद्दीत शिरूर हद्दीलगत असलेल्या सीमेवर कुकडी नदीच्या पात्रालगत गुनोरे शिवारात असलेल्या गर्द झाडीमध्ये ही कारवाई केली.
अहमदनगरमध्ये अवैध दारू भट्टी पोलिसांनी केली उध्वस्त; अडीच लाखांची गावठी दारू नष्ट - illegal liquor manufacturing
या कारवाईत कॉम्बिंग ऑपरेशन राबवून 4000 लिटर रसायन, तयार गावठी दारू 175 लिटर आणि दारू भट्टी चे साहित्य असे एकूण 2 लाख 42 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला.
हेही वाचा -आमदार रोहित पवारांच्या 'जनता सुसंवाद'मध्ये तक्रारींचा पाऊस..
मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार कॉम्बिंग ऑपरेशन राबवून 4000 लिटर रसायन, तयार गावठी दारू 175 लिटर आणि दारू भट्टी चे साहित्य असे एकूण 2 लाख 42 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला. पोलीस पथकाची चाहूल लागल्यामुळे आरोपी प्रकाश सुरेश पवार (रा. म्हसे बु. ता. शिरूर) हा नदी पात्रातून अंधाराचा फायदा घेत पळून गेला. रासायनिक परीक्षणासाठी मनुना राखून इतर रसायन आणि साहित्य जागीच नष्ट करून आरोपी विरोधात पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.