अहमदनगर- श्रीगोंदा तालुक्यातील भीमा नदी पात्रात अवैधपणे वाळू उपसा करणाऱ्या बोटींवर कारवाई करण्यात आली. नदीतील ७ यांत्रिक बोटी महसूल आणि गुन्हे अन्वेषण शाखेने जिलेटिनच्या साहाय्याने स्फोट करुन नष्ट केल्या. या बोटींची किंमत ३५ लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
श्रीगोंद्यात अवैध वाळू उपसा करणाऱ्या 7 यांत्रिक बोटी स्फोटाने उडवल्या
जिल्हा पोलीस अधीक्षक इशू सिंधू यांनी सध्या अवैध वाळू तस्करांविरोधात जोरदार मोहीम उघडली आहे. श्रीगोंदा तालुक्यातील सांगवी दुमाला या भागात नदीपात्रामध्ये वाळू तस्कर अवैधपणे वाळू उपसा करत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.
जिल्हा पोलीस अधीक्षक इशू सिंधू यांनी सध्या अवैध वाळू तस्करांविरोधात जोरदार मोहीम उघडली आहे. श्रीगोंदा तालुक्यातील सांगवी दुमाला या भागात नदीपात्रामध्ये वाळू तस्कर अवैधपणे वाळू उपसा करत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनुसार श्रीगोंद्याचे तहसीलदार महेंद्र माळी यांच्यासह महसूल आणि पोलीस यांच्या संयुक्त पथकाने या ठिकाणी छापा टाकला. पोलिसांना पाहताच वाळू उपसा करणारे तस्कर आणि कामगार यांनी तिथून पळ काढला.
पोलिसांनी या सर्व यांत्रिक बोटी जिलेटिनच्या साहाय्याने स्फोट घडवत जागेवरच नष्ट केल्या. यामध्ये दोन लोखंडी तर पाच फायबरच्या यांत्रिक बोटी आहेत. गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार, सहायक फौजदार सोन्याबापू नाणेकर, विजय वेठेकर, रवींद्र कर्डिले, राहुल सोळुंके, ज्ञानेश्वर शिंदे, कमलेश पायसर यांच्यासह तलाठी रुपेश भावसार यांच्या पथकाने ही कारवाई केली.