महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Police suicide: पोलीस कर्मचाऱ्याची स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या - police Committed suicide in rahuri

राहुरी तालुक्यातील मुळा धरणावर (Mula Dam Rahuri) सुरक्षा गार्ड म्हणून कामावर असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली (police Committed suicide in rahuri). भाऊसाहेब दगडू आघाव असे या ४९ वर्षीय कर्मचाऱ्याचे नाव असून ते राहणारे बारागांव नांदूर येथील आहेत.

police guard
भाऊसाहेब दगडू आघाव

By

Published : Oct 1, 2022, 3:48 PM IST

राहुरी:राहुरी तालुक्यातील मुळा धरणावर (Mula Dam Rahuri) सुरक्षा गार्ड म्हणून कामावर असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने स्वतःवर गोळी छाडून आत्महत्या केली. (police Committed suicide in rahuri). या घटनेने पोलीस वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. भाऊसाहेब दगडू आघाव असे या ४९ वर्षीय कर्मचाऱ्याचे नाव असून ते राहणारे बारागांव नांदूरा येथील आहेत.

सकाळी नऊ वाजता आपली ड्युटी संपल्यावर घरी जाण्याच्या वेळेस कर्मचाऱ्याने पोलीस चौकीचा दरवाजा आतून बंद केला. त्यानंतर त्यांनी आपल्या सर्विस रायफल मधून स्वतःवर गोळी झाडली, त्यातच त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती कळताच राहुरी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली व आपला तपास सुरू केला.

राहुरीचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, तहसीलदार फसियोद्दीन शेख, जलसंपदा खात्याचे उप अभियंता शरद कांबळे तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील घटनास्थळी दाखल झाले आहेत. कर्मचाऱ्याच्या आत्महत्येचं कारण मात्र अद्याप समजू शकलेल नाही आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details