अहमदनगर - आज 21 ऑक्टोबर, हा दिवस देशभरात 'पोलीस हुतात्मा दिन' म्हणून पाळण्यात येतो. या दिनाच्या निमित्ताने अहमदनगर येथील जिल्हा मुख्यालयात पोलीस हुतात्मा स्तंभाला, पुष्पचक्र अर्पण करून हुतात्मा झालेल्या पोलिसांप्रति आदरांजली वाहन्यात आली. या कार्यक्रमास मनपा आयुक्त श्रीकांत मायकलवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
पोलीस हुतात्मा दिन : जिल्हा मुख्यालयात वीरांना वाहिली मानवंदना - पोलीस हुतात्मा दिन न्यूज
आज 21 ऑक्टोबर, हा दिवस देशभरात 'पोलीस हुतात्मा दिन' म्हणून पाळण्यात येतो. या दिनाच्या निमित्ताने अहमदनगर येथील जिल्हा मुख्यालयात पोलीस हुतात्मा स्तंभाला, पुष्पचक्र अर्पण करून हुतात्मा झालेल्या पोलिसांप्रति आदरांजली वाहन्यात आली.
पोलीस हुतात्मा दिन : जिल्हा मुख्यालयात हुतात्मा पोलिसांना मानवंदना
प्रभारी जिल्हा पोलीस प्रमुख दत्ताराम राठोड, शहर विभागाचे उपअधीक्षक विशाल ढुमे, ग्रामीण उपअधीक्षक अजित पाटील यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी, निरीक्षक, पोलीस कर्मचारी आदीजण देखील यावेळी उपस्थित होते. यावेळी देशभरात कर्तव्य बजावत असताना हुतात्मा झालेल्या पोलिसांना मानवंदना देत सलामी म्हणून बंदुकीतून हवेत फायर करण्यात आले. तसेच स्मृती स्तंभाला पुष्पचक्र अर्पण करण्यात आले.
आजच्या दिवशीच म्हणजे 21 ऑक्टोबर 1959 रोजी लडाखमध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या तुकडीने चीन सैनिकांना रोखताना देशाच्या सीमेचे रक्षण केले. हॉट स्प्रिंग या बर्फाळ प्रदेशात लपून बसलेल्या चिनी सैन्याने अचानक हल्ला केला. चिनी सैनिकांशी झालेल्या चकमकीत शौर्य बजावताना राखीव दलाच्या दहा पोलीस जवानांना हौतात्म्य पत्करावे लागले. मात्र आपल्या भारतीय सीमेचे या सैनिकांनी रक्षण केले. कर्तव्य बजावताना पोलीस दलाच्या या शौर्याची आठवण म्हणून आणि त्याच बरोबर वर्षभर देशात आणि विविध राज्यात आपले कर्तव्य बजावत असताना अनेक पोलीस अधिकारी कर्मचारी आपले प्राणार्पण करतात. सेवा बजावताना देशासाठी केलेल्या बलिदानाची आठवण म्हणून आजच्या दिवशी देशभरातील पोलीस या हुतात्म्यांना आदरांजली वाहतात. या निमित्ताने सर्व देशभर पोलीस दलाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.