महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

...आणि अखेर महिला पोलिसांनी 'येड्यांचा' बाजार उठवला! - अहमदनगर कोरोना अपडेट

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार नागरिकांना गर्दी न करण्याची विनंती करत आहे. तरी देखील नागरिकांच्या डोक्याामध्ये प्रकाश पडत नसल्याचे चित्र अहमदनगरमध्ये बघायला मिळाले.

Ahmednagar Market
कृषी उत्पन्न बाजार समिती

By

Published : Mar 24, 2020, 5:36 PM IST

अहमदनगर - 'कृषी उत्पन्न बाजार समिती'मध्ये भाजीपाल्याचा बाजार भरला होता. मात्र, हा बाजार भाजीपाल्याचा होता ही वेड्यांचा अशी म्हणायची वेळ आली आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार नागरिकांना गर्दी न करण्याची विनंती करत आहे. तरी देखील नागरिकांच्या डोक्याामध्ये प्रकाश पडत नसल्याचे चित्र अहमदनगरमध्ये बघायला मिळाले.

महिला पोलिसांनी जमलेल्या गर्दीला मार दिला

हेही वाचा -COVID-19 LIVE : आवश्यक असेल तिथे कर्फ्यू लागू करा, केंद्राचे राज्यांना निर्देश.

रोजच्या जीवनात लागणाऱ्या आवश्यक सर्व वस्तू नागरिकांना उपलब्ध राहणार आहेत, अशी माहिती सरकारने लोकांना दिली आहे. त्याची अंमलबजावणीही होत आहे. तरीही नगरमध्ये एकाचवेळी शेकडो लोकांनी भाजी-पाल्यासाठी गर्दी केली. ही गर्दी हटवण्यासाठी अखेर पोलीस प्रशासनाला बळाचा वापर करावा लागला. जमलेल्या गर्दीला महिला पोलिसांनी लाठ्या-काठ्यांचा प्रसाद द्यावा लागला.

ABOUT THE AUTHOR

...view details