महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या 6 जणांना अटक, घातक हत्यारे जप्त - ARRESTED

दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या ६ जणांना संगमनेर शहर पोलिसांनी अटक केली आहे. संगमनेर परिसरातील तिरंगा रोड परिसरात पोलिसांनी दरोडेखोरांना अटक केली.

जप्त केलेली हत्यारे

By

Published : Mar 8, 2019, 7:33 PM IST


अहमदनगर - दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या ६ जणांना संगमनेर शहर पोलिसांनी अटक केली आहे. संगमनेर परिसरातील तिरंगा रोड परिसरात पोलिसांनी दरोडेखोरांना अटक केली. आरोपींकडून ३ मोटारसायकलींसह मोठ्या प्रमाणात हत्यारे जप्त करण्यात आली आहेत.

या कारवाईने शहरात दरोड्याचा प्रकार घडण्याआधीच उघड झाला आहे. या कारवाईमुले पोलिसांचे कौतुक होत आहे. यातील ३ आरोपी पळून गेले होते. पोलीस उपनिरीक्षक पंकज निकम, विजय पवार, सुभाष बोडखे, विजय खण्डीझोड, अमृत आढाव, साई तळेकर यांनी पाठलाग करून आरोपींच्या मुसक्या आवळल्या.

शुक्रवारी पहाटे मालदाड रोडवरील तिरंगा चौकात काही संशयित हालचाली सुरु असल्याचा संशय शहर पोलिसांच्या गस्ती पथकाला आला. त्यानंतर पोलिसांनी त्यांचा मागोवा घेत त्यांना अटक केले. त्यांच्याकडून ३ मोटारसायकलसह करवत, कुर्‍हाड, गिरमीट मशीन, तलवार सुताची दोरी असा जवळपास 1 लाखाचा ऐवज जप्त केला आहे.

पोलिसांची कारवाई

याप्रकरणी, सचिन गोपीनाथ म्हस्कुले (वय 28, रा. धांरदरफळ), विजय लखन तामचीकर (वय 25, रा. राहुरी), भिमा बाजीराव डोके (वय 20, रा.धांदरफळ), राहुल अशोक गुंजाळ (वय 19, रा.निमज), गणेश संभाजी पर्बत (वय 24, रा.निंभाळे) व शेखर साहेबराव कातोरे (वय 28, रा.सांगवी) या 6 जणांना अटक केली असून त्यांच्यावर भा.द.वी.कलम 399, 402 सह भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उप अधीक्षक अशोक थोरात, पोलीस निरीक्षक अभय परमार यांच्या मार्गदर्शनखाली पोलीस उपनिरीक्षक पंकज निकम करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details