महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शिर्डीत एकाच कुटुंबातील चौघांना विषबाधा; बहीण-भावाचा मृत्यू - shirdi news

गुरुवारी उपवास सोडताना एकत्रित जेवण करताना जेवणात डाळभात, बटाटा, टमाटा चटणी हे पदार्थ खाण्यात आले होते. मात्र, त्यानंतर काही वेळातच कृष्णा, श्रावणी, वैष्णवी व आजी भगीरथी गंगाधर सुपेकर या सर्वांना मळमळ, उलटयांचा त्रास होऊ लागला. उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले असता कृष्णा व श्रावणी या भावंडांचा मृत्यू झाला.

विषबाधा
शिर्डी

By

Published : Dec 10, 2019, 10:42 AM IST

Updated : Dec 10, 2019, 11:39 AM IST

अहमदनगर- संगमनेर शहरात अन्नातून विषबाधा झाल्याने एकाच कुटुंबातील दोन सख्या बहीण-भावाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कृष्णा दिपक सुपेकर (६), श्रावणी दिपक सुपेकर(९) या बहिण-भावंडांचा मृत्यू झाला असून मोठी बहिण वैष्णवी दीपक सुपेकर (१३) यांच्यावर संगमनेरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

एकाच कुटुंबातील चौघांना विषबाधा

मूळचे संगमनेर तालुक्यातील नांदूर खंदरमाळ येथील दीपक गंगाधर सुपेकर व कुटुंब कामानिमित्त संगमनेर शहरात स्थायिक झाले आहेत. शहरातील मालदाड रोडवरील आंबेडकर नगर वसाहतीत वास्तव्याला आहेत. मोलमजूरी करुन सुपेकर आणि पत्नी मंगल आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.

गुरुवारी (५ डिसेंबर) रात्री नऊ वाजेच्या सुमारास नेहमीप्रमाणे सर्वांनी उपवास सोडवत एकत्रित जेवण केले होते. जेवणात डाळभात, बटाटा, टमाटा चटणी हे पदार्थ खाण्यात आले होते. मात्र, त्यानंतर काही वेळातच कृष्णा, श्रावणी, वैष्णवी व आजी भगीरथी गंगाधर सुपेकर या सर्वांना मळमळ, उलटयांचा त्रास होऊ लागला. पण काही वेळाने त्यांना परत बरे वाटू लागले.

दुसऱ्या दिवशी शुक्रवार (६ डिसेंबर) सकाळी पुन्हा त्यांना त्रास झाल्यानंतर चौघांनाही शहरातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये औषध उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, कृष्णाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याचा रविवारी सकाळी मृत्यू झाला. श्रावणी हिच्यावर लोणी येथे औषधोपचार सुरु असताना अचानक तिचीही प्रकृती खालावल्याने रविवारी रात्री अकाराच्या सुमारास तिचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. आजी भगीरथी गंगाधर सुपेकर यांची प्रकृती स्थिर असून मोठी मुलगी वैष्णवी हिच्यावर शहरातील खासगी हॉस्पीटलमध्ये उपचार सुरु आहेत. तिच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत आहे.

Last Updated : Dec 10, 2019, 11:39 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details