अहमदनगर- जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. सातवीत शिकणाऱ्या बारा वर्षीय मुलाने पहिलीत शिकणाऱ्या सहा वर्षीय मुलीला निर्जन स्थळी नेत अत्याचार केला.
पाथर्डीत सहा वर्षाच्या मुलीवर अत्याचार; अल्पवयीन आरोपी अटकेत - निवडुंगे गाव
12 वर्षाच्या मुलाने सहा वर्षाच्या मुलीवर अत्याचार केल्याची खळबळजनक घटना पाथर्डी तालुक्यात घडली. पोलिसांनी अल्पवयीन आरोपीला अटक केली आहे.
पाथर्डी पोलीस
मुलीचे आईवडील मजुरीला गेले असताना वृद्धेश्वर साखर कारखाना परिसरातील एका गावात हा प्रकार घडला. मुलीचे आई-वडील घरी आल्यावर त्यांनी रक्तस्राव पाहिला. त्यानंतर तिला दवाखान्यात नेण्यात आले. डॉक्टरांनी मुलीची तपासणी केल्यावर तिच्यावर बलात्कार झाल्याचे त्यांनी सांगितले. लागलीच कुटुंबीयांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले आहे. या घटनेतील आरोपी अल्पवयीन असल्याने संताप आणि चिंता व्यक्त होत आहे.