शिर्डी- अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणातील आरोपी श्रीरामपूर शहर पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला आहे. राहुल गणेश शिंदे असे त्या आरोपीचे नाव आहे.
हेही वाचा -शेतकरी, शेतमजूरसह महिलांच्या विविध प्रश्नांसाठी आझाद मैदान येथे आंदोलन

देशभरात घडत असलेल्या बलात्कारांच्या घटनांमुळे जनतेत तीव्र रोष आहे. त्यात हैदराबाद येथील बलात्कार व हत्या प्रकरणातील आरोपींचे पोलिसांनी एन्काऊंटर केल्याने त्यांचे कौतुक केले जात आहे. तर, दुसरीकडे अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहर पोलिसांच्या हातावर तुरी देऊन अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल असलेला आरोपी पसार झाला आहे.
आरोपी राहुल शिंदेवर ३ डिसेंबरला श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात कलम ३७६ व पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. २० वर्षीय राहुल शिंदे हा शहरातील खिल्लारी वस्ती, येथील रहिवासी असल्याचे समोर आले आहे.
आरोपी हा पोलीस कोठडीत असल्याने त्याला वैद्यकीय तपासणीसाठी पोलीस श्रीरामपूर ग्रामीण रुग्णालयात घेऊन गेले होते. यावेळी आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाल्याचा प्रकार घडला. यामुळे पोलिसांच्या कर्तव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत असून, त्याठिकाणी असलेले पोलीस हे आरोपी पसार होईपर्यंत काय करत होते? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.