अहमदनगर - कोरोनाची वाढती रुग्ण संख्या व या रुग्णांसाठी आवश्यक असलेला ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे सातत्याने पाठपुरावा करत आहे. लोहारे येथील ऑक्सिजन रिफिलिंग केंद्रास पेसो कडून तातडीची मान्यता मिळवून दिल्याने दररोज नव्याने सातशे ऑक्सीजन सिलिंडर उपलब्ध होणार आहेत.
लोहारे येथील ऑक्सिजन रिफिलिंग केंद्रास पेसोची मान्यता; ऑक्सिजन पुरवठा होणार सुरळीत
संगमनेर तालुका व परिसरातील कोरोना रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात सातत्याने पाठपुरावा करत आहेत. थोरात यांनी जिल्ह्यासाठी वाढीव ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध करुन दिले आहे. थोरात यांनी कारखान्याचे संचालक इंद्रजित थोरात यांनी लोहारे मीरपूर येथील ऑक्सिजन रिफिलिंग सेंटरला भेट दिली.
संगमनेर तालुका व परिसरातील कोरोना रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी सातत्याने पाठपुरावा करत आहे. थोरात यांनी जिल्ह्यासाठी वाढीव ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध करुन दिले आहे. थोरात यांनी कारखान्याचे संचालक इंद्रजित थोरात यांनी लोहारे मीरपूर येथील ऑक्सिजन रिफिलिंग सेंटरला भेट दिली. यावेळी संचालक भाऊराव जोंधळे, डॉ. संदीप पोकळे, भाऊराव कदम, कृष्णा पोकळे आदी उपस्थित होते. संगमनेरमध्ये कोरोना आढावा बैठकीत ऑक्सिजन पुरवठादार राम सुरेश जाजू यांना बोलावून सूचना दिल्या होत्या. तसेच अहमदनगर शहरात तातडीने ऑक्सिजन पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा राबवून शहरातील रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.
तळेगाव भागातील लोहारे-मीरपूर येथे कार्यरत असलेले ऑक्सिजन रेफिलिंग सेंटर काही तांत्रिक अडचणीमुळे बंद होते. यास इंद्रजीत थोरात यांनी तांत्रिक अडचणी समजून घेत मंत्रालयीन स्तरावर पाठपुरावा केला. याबाबत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पेसो कडून तातडीची मंजूरी मिळवून दिली. त्यामुळे उद्योगाला ऑक्सिजन देण्याऐवजी हा ऑक्सिजन पुरवठा शासकीय व खासगी रुग्णालयात रुग्णांना ऑक्सिजन पुरविल्या जाणार आहे.