महाराष्ट्र

maharashtra

चांदेगावातील विषाणूपासून बचाव करण्यासाठी बनवले 'निगेटिव्ह आयन जनरेटर'

By

Published : Jun 15, 2020, 3:17 PM IST

चांदेगाव गावातील गोपाल शिंदे यांनी हवेतील विषाणूंना नष्ट करणारे 'निगेटिव्ह आयन जनरेटर' हे युनिट तयार केले आहे. हे युनिट गर्दीच्या जागी कोरोनाच्या विषाणूंपासून लोकांचा बचाव करेल, असा दावा शिंदे यांनी केला आहे.

ahmednagar
gopal shinde

अहमदनगर- कोरोनाने जगभरात हाहाकार माजवला आहे. भारतातदेखील कोरोनाची वाढती आकडेवारी चिंता वाढवत आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील चांदेगावमधल्या एका शेतकरी कुटुंबातील गोपाल भागवत शिंदे यांनी एक यंत्र तयार केले. लॉकडाऊनमुळे मिळालेल्या वेळेचा फायदा घेऊन त्यांनी गर्दीच्या ठिकाणी हवेतील विषाणूंपासुन बचाव करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञानावर आधारित 'निगेटिव्ह आयन जनरेटर' हे युनिट तयार केले आहे. कोरोनाविरुद्धच्या लढ्यात हे युनिट शाळा, कॉलेजसह गर्दीच्या ठिकाणी उपयुक्त ठरेल, असा दावा गोपाल शिंदेंनी केला आहे.

सध्या शाळा, कॉलेज कसे सुरू करायचे? बाजारपेठेतील गर्दी रोखून कोरोनापासून कसा बचाव करता येईल? असे अनेक प्रश्न आहेत. ते जाणून घेऊन शिंदे यांनी 'निगेटिव्ह आयन जनरेशन' या इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञानाची सखोल माहिती मिळविली आणि त्याचे अध्ययन केले. गोपाल हे इलेक्ट्रॉनिक पदवीकाधारक आहेत. तसेच त्यांना हाय-व्होल्टेजचे चांगले ज्ञान आहे. याचा वापर करत त्यांनी १४ दिवस झटून २० हजार व्होल्टेजचे (२० के. व्ही.) निगेटिव्ह आयन जनरेटर युनिट तयार केले आहे. त्यासाठी त्यांना जवळपास दहा हजार रुपये खर्च आला आहे.

हे युनिट बसवून कार्यरत केल्यानंतर व्होल्टेजच्या क्षमतेनुसार कमी-जास्त अंतराच्या परिघातील हवेतील तसेच टेबल, खुर्ची, बेंच, दरवाजे व अन्य ठिकाणी असलेल्या कोरोनाच्या विषाणूंचे कवच फोडून ते कोरोनाचा नाश करून टाकते. त्यामुळे कोरोनाच्या विषाणूंपासुन बचाव करता येऊ शकतो. गरजेनुसार ४०, ६०, ८०, १०० के. व्ही. क्षमतेचे हे युनिट तयार करता येते, असे शिंदे सांगतात.

कोरोनापासून बचावासाठी बनवले 'निगेटिव्ह आयन जनरेटर' मशीन
सध्या जगभर कोरोनाने थैमान घातले असल्याने देशात आणि विशेषतः महाराष्ट्रातही परिस्थिती खूप गंभीर आहे. शाळा, कॉलेज सुरू होण्याची वेळ आली आहे. मात्र, कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने शैक्षणिक वर्ष सुरू करण्याबाबत अजूनही अनिश्चितता आहे. अशा वेळी हे निगेटिव्ह आयन जनरेशन युनिट गर्दीच्या जागी कोरोनाच्या विषाणूपासून निश्चित बचाव करेल, असा त्यांचा दावा आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details