अहमदनगर- पाथर्डी तालुक्यातील टाकळी फाटा परिसरात बुधवारी रात्री वाढदिवसानिमित्ताने डीजेच्या कर्णकर्कश आवाजावर काही तरुण हातात तलवारी घेऊन नाचल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यानंतर काही जागरूक नागरिकांनी याची तक्रार पोलिसात केली असली, तरी अद्याप कारवाई झाली नसल्याची माहिती आहे.
भाई का बड्डे... तलवारी हातात घेऊन नाचले तरुण हेही वाचा -मुंबई अग्निशमन दलाकडे तीन वर्षांत 47 हजार तक्रारी
अशा पद्धतीने तलवारी घेऊन नाचणे अवैध असून गुन्हेगारी प्रवृत्तीला खतपाणी घालणारे आहे. त्यामुळे पोलिसांनी संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा -'राडा' हा शब्द काँग्रेस संस्कृतीला शोभत नाही
हातात तलवार घेऊन वाढदिवस साजरा करणारी व्यक्ती अवैध वाळू उपसा तसेच गुन्हेगारीशी निगडित असल्याचीही चर्चा आहे. पोलिसांना काही नागरिकांनी रात्रीच या प्रकाराची माहिती दिली होती. त्यानंतर पोलिसही घटनास्थळी गेले मात्र, तोपर्यंत संबंधितांना याची 'टीप' लागल्याने पोलिसांना ना डीजे आढळला ना तलवारी... आता पाथर्डी पोलीस संबंधितांवर काय कारवाई करतात, हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.