अहमदनगर - माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांच्या निधनामुळे स्थगित असलेली भजपची महाजनादेश यात्रा आज नगर जिल्ह्यातील पाथर्डी येथून पुन्हा सुरू झाली. यात्रेदरम्यान, पाथर्डी येथे झालेल्या सभेत, 'देशातील जनता मोदींच्या पाठीमागे खंबीरपणे उभी आहे. त्यामुळे, विरोधकांनी कितीही यात्रा काढल्या तरी किमान पंचवीस वर्षे जनता तुम्हाला सत्ता देणार नाही', अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीचा समाचार घेतला आहे.
विरोधकांनो कितीही यात्रा काढा.. किमान पंचवीस वर्षे जनता तुम्हाला सत्ता देणार नाही - मुख्यमंत्री
पाथर्डी येथे झालेल्या सभेत, 'देशातील जनता मोदींच्या पाठीमागे खंबीरपणे उभी आहे. त्यामुळे, विरोधकांनी कितीही यात्रा काढल्या तरी किमान पंचवीस वर्षे जनता तुम्हाला सत्ता देणार नाही', अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीचा समाचार घेतला आहे.
पाथर्डी तालुक्यात यात्रेच्या मार्गावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी जनतेला अभिवादन केले. सभेदरम्यान काँग्रेस-राष्ट्रवादीला धारेवर धरत ते म्हणाले, "तुम्ही 15 वर्षांच्या कारकिर्दीत केलेल्या चुकीच्या कामांना आणि मुजोरीपणाला त्रस्त होऊन जनतेने तुम्हाला नाकारले आहे. जनतेचा भाजपवर विश्वास आहे. त्यामुळे येणाऱ्या काळातही केवळ भाजपच सत्तेवर येईल."
सभेला मुख्यमंत्र्यांसह पालकमंत्री राम शिंदे, खासदार सुजय विखे, आमदार मोनिका राजळे, आमदार शिवाजी कर्डीले, आमदार वैभव पिचड आदी उपस्थित होते.