महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Food Poisoning In Kopargaon : कोपरगावात भगर खाल्ल्याने 21 जणांना विषबाधा - Food Poisoning In Kopargaon

कोपरगाव तालुक्यात ( Poisoning in Kopargaon Taluk ) गेल्या दोन दिवसात उपवासात भगर खाल्याने 21 जणांना विषबाधा ( 21 people poisoned by eating bhagar ) झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये कोपरगाव शहरात ८, ( Poisoning in Kopargaon town ) तळेगाव मळे ६ तर, वारी येथे ८ अशा महिला पुरुष रुग्णाचा ( Food Poisoning In Kopargaon ) समावेश आहे.

Food Poisoning In Kopargaon
कोपरगावात भगर खाल्याने 21 जणांना विषबाधा

By

Published : Sep 30, 2022, 8:05 AM IST

कोपरगाव -कोपरगाव तालुक्यात ( Poisoning in Kopargaon Taluk ) गेल्या दोन दिवसात उपवासात भगर खाल्याने 21 जणांना विषबाधा ( 21 people poisoned by eating bhagar ) झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये कोपरगाव शहरात ८, ( Poisoning in Kopargaon town ) तळेगाव मळे ६ तर, वारी येथे ८ अशा महिला पुरुष रुग्णाचा समावेश ( Food Poisoning In Kopargaon ) आहे. या सर्व रुग्णांना उलट्या, जुलाब, मळमळने, चक्कर येणे अशी लक्षणे जाणवत होती. मात्र सौम्य लक्षणे असल्याने तात्काळ शासकीय ग्रामीण रुग्णालयात उपचार केल्याने त्यांची प्रकृती स्थिर आहे.

भगर खाल्याने विषबाधा -नवरात्र उत्सवात भक्तीभावातून मोठ्या प्रमाणात उपवास केले जातात. यासाठी शाबूदाणा तसेच भगरीचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. दोन दिवसांपूर्वी कोपरगाव शहरातील बाजारतळ येथील धरम कानकुब्जी, त्यांची पत्नी, मुलगी यांनी भगर पीठ खाल्ल्यानंतर त्यांना विषबाधा झाल्याचे समोर आले होते. तसेच वारी येथील 4 तळेगाव मळे येथील सहा व्यक्तींना विषबाधा झाली होती. तसेच म्हसोबा नगर येथील उषा ज्ञानेश्वर विखनकर, इंदिरानगर येथील चंद्रकला नवनाथ खडांगले, (वय 35) गंगुबाई माधव खडांगळे, (वय 65) निर्मला संजय खडांगळे, (वय 39) रमाबाई कारभारी सोनवणे, (वय 50) यांना विष बाधा झाली असल्याने त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालय कोपरगाव येथे उपचार सुरू असुन त्यांची प्रकृती स्थिर आहे.

डॉ विकास घोलप, तालुका आरोग्य अधिकारी

भगरीचे नमुने तपासणीसाठी - दरम्यान भगर खाल्याने विषबाधा झालेल्या रुग्णांना कोपरगाव पंचायत समितीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विकास घोलप यांनी प्रत्यक्षात भेट देऊन पाहणी केली. जी भगर खाऊन विषबाधा झाली. त्या भगरिच्या पंकिग तपासली असता त्यावर उत्पादकाचे पत्ता उत्पादनाची तारीख अंतिम तारीख बच नंबर याचा कोठेच उल्लेख नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. डॉ. घोलप यांनी सांगितले. की, ज्या भगरीमुळे विषबाधा झाली तिचे नमुने घेऊन त्यांची तपासणी करण्यासाठी पाठविण्यात आले आहे.


दोष भगरमध्ये नसून भगरच्या पिठामध्ये असू शकते सध्या कोपरगाव शहराचा तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात भगरची विक्री झालेली असून काही नागरिकांना त्रास झालेला आहे. त्यामुळे भगरच्या पिठाची विक्री बंद केलेली आहे असे, व्यापारी असोसिएशनचे सुधीर डागा यांनी म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details