महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'महाराष्ट्र केसरी'च्या गावात जल्लोष!

हर्षवर्धनला महाराष्ट्र केसरी होण्याची फार पूर्वीपासून इच्छा होती. त्याचे आजोबदेखील नामांकित पैलवान होते. मागील पाच वर्षांपासून आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलात 'अर्जुन'वीर वस्ताद काका पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तो मल्लविद्येचे धडे गिरवत आहे. साई समाधी शताब्दी उत्सवानिमित्ताने शिर्डी येथे झालेल्या 23 वर्षाखालील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत ग्रीको-रोमन कुस्ती प्रकारात त्याने पदक मिळवले आहे. तसेच हरियाणातील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेतसुद्धा त्याने पदकाची कमाई केली आहे.

By

Published : Jan 8, 2020, 1:53 AM IST

people of kobhalne  celebrated harshavardhan,s victory
'महाराष्ट्र केसरी'च्या गावात जल्लोष!

अहमदनगर - महाराष्ट्र केसरी स्पर्धेत विजेते पद पटकविल्यानतंर हर्षवर्धन मुकेश सदगीर याच्या कोंभाळणे या मूळ गावात एकच जल्लोष करण्यात आला. हर्षवर्धनने लातूरच्या शैलशे शेळकेचा ३-२ ने पराभव करत मानाची गदा पटकावली आहे.

हेही वाचा - दीपिका पदुकोणने घेतली जेएनयू विद्यार्थ्यांची भेट, विद्यार्थ्यांचे जोरदार शक्ती प्रदर्शन

मंगळवारी पुण्यातील बालेवाडी स्टेडियममध्ये झालेल्या 'महाराष्ट्र केसरी 2020' स्पर्धेत अंतिम सामन्यात हर्षवर्धनने 'महाराष्ट्र केसरी'चा किताब मिळवत अकोले तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. टाहाकारी येथील अंबिका विद्यालयात प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून कार्यरत असणाऱ्या मुकेश सदगीर यांचा हर्षवर्धन हा मुलगा आहे. त्याची कौटुंबिक परिस्थिती जेमतेम असून आई ठकूबाई सदगीर या गृहिणी आहेत तर भाऊ जगन सदगीर हा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षेची तयारी करत आहे. सोमवारी उपांत्यपूर्व फेरीत हर्षवर्धनने गतविजेता अभिषेक कटके याचा पराभव करून अंतिम सामन्यात प्रवेश केल्यानतंर कोंभाळणे गावातील उपसरपंच , ग्रामस्थांसह, नातेवाईक अंतिम सामना पाहण्यासाठी बालेवाडी स्टेडियम येथे गेले होते. दरम्यान, हर्षवर्धनने अंतिम सामन्यात विजय मिळवताच गावात फटाक्यांची आतिषबाजी करून एकच जल्लोष करण्यात आला.

हर्षवर्धनचे आजोबा देखील नामांकित पैलवान होते. मागील पाच वर्षांपासून आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलात 'अर्जुन'वीर वस्ताद काका पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तो मल्लविद्येचे धडे गिरवत आहे. साई समाधी शताब्दी उत्सवानिमित्ताने शिर्डी येथे झालेल्या 23 वर्षाखालील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत ग्रीको-रोमन कुस्ती प्रकारात त्याने पदक मिळवले आहे. तसेच हरियाणातील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेतसुद्धा त्याने पदकाची कमाई केली आहे. गतवर्षी जालना येथील महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत उपांत्य फेरीत येऊनसुद्धा त्याने स्पर्धेतून माघार घेतली होती. त्याला 'महाराष्ट्र केसरी' होण्याची फार पूर्वीपासून इच्छा होती. यासाठी त्याने अतोनात परिश्रम घेत आपले स्वप्न पूर्ण केले. आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर गावाचे नाव राज्याच्या कान्याकोपऱ्यात पोहचवले असून गावाचा व समाजाचा सन्मान वाढविला असल्याची प्रतिक्रिया उपसरपंच गोविंद सदगीर यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details