शेवगाव (अहमदनगर) - स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राज्यभर पुकारलेल्या एक दिवसीय लाक्षणिक दूध बंद आंदोलनाला शेवगावमध्ये उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या आवाहनाला डेरी चालक, दूध संकलन केंद्र चालक व शेतकरी यांनी चांगला प्रतिसाद दिला. दुधाला प्रति लिटर ५ रुपये अनुदान शासनाकडून मिळावे व पुढील तीन महिन्यांसाठी सरकारने थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रति लिटर पाच रुपये अनुदान जमा करावे, म्हणजे 3/5 फॅटनुसार २५ रुपये दर दुधाला देण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले.
स्वाभिमानीच्या दूध आंदोलनाला शेवगावमध्ये उस्फूर्त प्रतिसाद - दूध आंदोलन न्यूज
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राज्यभर पुकारलेल्या एक दिवसीय लाक्षणिक दूध बंद आंदोलनाला शेवगावमध्ये उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या आवाहनाला डेरी चालक, दूध संकलन केंद्र चालक व शेतकरी यांनी चांगला प्रतिसाद दिला.
केंद्र शासनाने दहा हजार टन दूध पावडर आयात करण्याचा निर्णय रद्द करावा, 30 हजार टन दूध पावडरचा बफर स्टॉक तयार करावा तसेच दूध पावडरसाठी प्रति किलो 30 रु. देण्यात यावेत. त्याचप्रमाणे दूध पावडर, तूप, दही, बटर, श्रीखंड, पनीर इत्यादी दुग्धजन्य पदार्थावरील जीएसटी पूर्णपणे रद्द करण्यात यावा. तसेच शेतकऱ्यांना शेतीपूरक व्यवसाय म्हणून दूध व्यवसाय मोडकळीस येऊ नये, मोठ्या प्रमाणात वाढलेले पशुखाद्याचे दर, या मुद्यावरुन शेतकरी संघटनेने आंदोलन पुकारले आहे. शेवगाव तालुक्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून सर्व दूध संकलन केंद्रांना आवाहन करण्यात आले आहे की, त्यांनी आपले संकलन केंद्र बंद ठेवून या आंदोलनास सहकार्य करावे.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पक्ष जिल्हा अध्यक्ष राऊसाहेब लवांडे, महिला जिला अध्यक्ष स्नेहल फुंदे, शेवगाव तालुका अध्यक्ष प्रशांत भराट, संघटना तालुका अध्यक्ष प्रवीण मस्के, महिला तालुका अध्यक्ष बायजाबाई बटूळे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब फटांगडे इत्यादी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तालुक्यामध्ये दूध आंदोलन यशस्वी केले.