अहमदनगर - सावेडी उपनगरातील एकविरा चौकात पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनचा व्हॉल्व फुटल्याने चौकाला तलावाचे स्वरूप आले. त्यामुळे या ठिकाणी दिवाळीनिमित्त दुकाने लावलेल्या विक्रेत्यांचे आणि खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली. पालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळेच हा व्हॉल्व फुटल्याची तक्रार नागरिक आणि दुकानदार करत आहेत.
अहमदनगर : पाण्याचा व्हॉल्व फुटल्याने विक्रेते-नागरिकांची दिवाळी बाजारात तारांबळ - सावेडी उपनगर न्यूज
एकविरा चौकात रविवारी सकाळी ग्राहकांची गर्दी असताना पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी व्हॉल्व दुरुस्तीचे काम सुरू केले. हा व्हॉल्व अचानक फुटला आणि त्यातून मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावर वाहू लागले.
हेही वाचा - साई मंदिर परिसरातील 'हा' आकाश कंदील ठरतोय आकर्षणाचे केंद्र
दिवाळी सणाच्या निमित्त विविध साहित्यांची दुकाने रस्त्याच्या कडेला तात्पुरत्या स्वरूपात थाटली जातात. नागरिकसुद्धा या ठिकाणीच खरेदीसाठी गर्दी करत असतात. एकविरा चौकात रविवारी सकाळी ग्राहकांची गर्दी असताना पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी व्हॉल्व दुरुस्तीचे काम सुरू केले. हा व्हॉल्व अचानक फुटला आणि त्यातून मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावर वाहू लागले. या पाण्यामुळे दुकानदारांची आणि ग्राहकांची मोठी अडचण झाली. नागरिकांनी पालिका कर्मचाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.