अहमदनगर - आज (मंगळवार) महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 129 वी जयंती आहे. दरवर्षी संपुर्ण जगभरात ही जयंती मोठ्या उतस्हात आणि विविध कार्यक्रमांसह साजरी होत असते. मात्र, दरवर्षी हजारो लाखो भीम अनुयायांच्या उपस्थिती साजरी होणारी बाबासाहेबांची जयंती यावर्षी कोरोना विषाणू आणि लॉकडाऊनमुळे अनुयायांशिवाय साजरी होत आहे.
अहमदनगरमध्ये महामानवाची जयंती अनुयायांशिवाय; पुतळ्याभोवती पोलिसांचा बंदोबस्त हेही वाचा...ईटीव्ही भारत विशेष: लाॅकडाऊनमध्ये आदिवासी शिक्षितांपेक्षाही समजूतदार..
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जल्लोषात, मिरवणुका काढून साजरी केली जाते. मात्र, या वर्षीच्या जयंतीवर करोना वायरसचे सावट आहे. त्यामुळे यावर्षी जयंती साधेपणाने आणि घरीच साजरी केली जात आहे.
अहमदनगर शहरातील आंबेडकर पुतळ्याभोवती दरवर्षी असणारी तुफान गर्दी, यापैकी कशाचाही लवलेश आज दिसून आला नाही. अनुयायांऐवजी पोलिसांचा बंदोबस्त मात्र मोठ्या प्रमाणात भल्या पहाटेपासून या ठिकाणी आहे. उत्साही कार्यकर्त्यांकडून आदेशाचा भंग होऊ नये, याची पोलीस पुरेपूर काळजी घेत आहे