अहमदनगर -वादग्रस्त कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांना आणखी एक मोठा दिलासा मिळाला आहे. अहमदनगरच्या पीसीपीएनडीटी (लिंग निवडीस प्रतिबंध समिती) समितीने सायबर सेलकडे इंदोरीकर यांच्या कीर्तनाच्या व्हिडीओची सत्यता तपासण्यासाठी पत्र दिले होते. अहमदनगर सायबर सेलकडून याबाबत समितीला अहवाल देण्यात आला आहे. वादग्रस्त विधान असलेला व्हिडिओ युट्युबवर उपलब्ध नसल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.
सायबर सेलच्या अहवालामुळे सध्यातरी इंदोरीकरांवर पीसीपीएनडीटी समिती कुठलीही कारवाई करण्यास नकार देत आहे.