पाथर्डी(अहमदनगर)- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दूध उत्पादक शेतकर्यांच्या वतीने दूध दरवाढ मागणीची पत्रे पाठविण्यात आली. आमदार मोनिका राजळे यांच्या नेतृत्वाखाली पाथर्डीतील पोस्ट कार्यालयातून ही पत्रे पाठविण्यात आली. यावेळी शेतकरी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दूध उत्पादक शेतकर्यांना न्याय मिळावा यया मागणीसाठी राज्यभरात भाजपाकडून सरकार विरोधात आंदोलन करण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून आमदार राजळे यांच्या नेतृत्वाखाली हे पत्र पाठवण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी राजळे यांनी महाविकास आघाडीवर टीका केली.
महाराष्ट्राच्या दूध उत्पादक शेतकर्यांना आजपर्यंत आघाडी सरकारने कोणताही न्याय दिला नाही. तसेच त्यांच्या मागणीची दखलही घेतली नाही, त्यामुळे अशा परिस्थितीत शेतकरी उद्ध्वस्त होत चालला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळावा, त्यांच्या दुधाला भाव मिळावा म्हणून भाजपा व मित्र पक्षाच्यावतीने तिसऱ्या टप्प्यातील आंदोलनाला सुरुवात केली.