अहमदनगर -पारनेरचे नवनिर्वाचित आमदार निलेश लंके यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली. पारनेर मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आलेल्या विजय औटी यांनी पराभवाचा जोरदार धक्का देत निलेश लंके हे यंदाच्या विधानसभा निवडणूकीत निवडून आले होते. त्यानंतर काल त्यांनी राळेगणसिद्धीमध्ये जाऊन अण्णांचे आशिर्वाद घेतले. यावेळी अण्णा हजारे यांनी लंकेंचे अभिनंदन करत, त्यांना समाजाचे प्रश्न सोडवा असा सल्ला दिला.
पारनेर मतदारसंघ हा पूर्वी कम्युनिस्ट पक्षांचा मतदारसंघ म्हणून ओळखला जात असे. त्यानंतर इथे काँग्रेस-राष्ट्रवादीचे वर्चस्व होते. 2004 साली मात्र, काँग्रेसचे विजय औटी यांनी शिवसेनेत प्रवेश करून विजय मिळवला. तिथून पुढे तीन वेळा सलग विजय मिळवत त्यांनी हा मतदारसंघ आपल्या ताब्यात ठेवला.